• Thu. Aug 14th, 2025

निलंग्यात सफाई  कामगारांचा विविध मागण्यासाठी  बेमुदत  संप

Byjantaadmin

Aug 14, 2025

निलंग्यात सफाई  कामगारांचा विविध मागण्यासाठी  बेमुदत  संप…

निलंगा

येथील नगर परिषदेचे  सफाई कामगार (कंत्राटी) मजुर यांनी विविध मागण्यांसाठी  बेमुदत संप करीत असून  उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अनेक  कंत्राटी कामगार  बेमुदत संप  करीत आहेत.संपाचा आज पहिला दिवस असून

त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत त्यात प्रामुख्याने याकपूर्वी जे वेतन मिळत होते  ते अत्यंत तुटपुंजे वेतन आहे जे की,या वेतनमध्ये  कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नाही. त्यामुळे आज रोजी कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्या वेतनात वाढ करून १२ पाचशे रुपये करण्यात यावे त्याचप्रमाणे मार्च २०२५ ते ऑगस्ट २०२५ या मागील सहा महिन्याचे वेतन देण्यात यावे.वेतनाबाबत गुत्तेदारास विचारणा केली असता मुख्याधिकारी नाहीत आणि आणखीन तुमचे टेंडर भरलेले नाही याअगोदरचे तुमचे टेंडर संपलेले आहे असे उत्तर देत असल्याकारणाने कुटुंबावर आलेली उपासमारीची वेळ दूर करावी  असेही सफाई कामगारांचे म्हणणे आहे तसे निवेदन  उपविभागीय अधिकारी निलंगा यांना देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *