परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून लोकनेते विलासराव देशमुख यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली
लातूर प्रतिनिधी: दि. १४ ऑगस्ट २०२५ (गुरुवार):-
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवार, दि. १४ ऑगस्ट
२०२५ रोजी दुपारी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त
बाभळगाव येथील विलासबाग येथे जाऊन त्यांच्या स्मृतींना पुष्पांजली अर्पण
करत विनम्र अभिवादन केले.
त्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी बाभळगाव येथील निवासस्थानी
जाऊन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि माजी आमदार
धीरज विलासराव देशमुख यांची भेट घेतली. यावेळी देशमुख परिवाराच्या वतीने
त्यांना “असा घडला भारत” आणि विद्याधर कांदे पाटील लिखित “विलासराव
देशमुख महाराष्ट्राचा कोहिनूर” हे ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, संतोष देशमुख, अभिजीत
देशमुख, धीरज पाटील, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, इसरार सगरे,
सचिन मस्के, यशपाल कांबळे आदी उपस्थित होते.
