रोटरॅक्ट क्लब ऑफ आर्यावर्त लातूरच्या वतीने नैसर्गिक रंग आणि फुलांनी रंगपंचमी साजरी
लातूर : रोटरॅक्ट क्लब ऑफ आर्यावर्त लातूरच्या वतीने नैसर्गिक रंग आणि रंगबिरंगी फुलांनी रंगपंचमी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी साजरी करण्यात आली.
बाभळगाव रोडवरील आई पार्क स्कुल या ठिकाणी रोटरॅक्ट क्लब ऑफ आर्यावर्तच्या वतीने हा आगळा वेगळा रंगोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोटरी क्लब ऑफ लातूरचे सचिव श्रीमंत कावळे, डॉ. संजय जोगदंड, महेंद्र जोशी, भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव, लातूर वृक्ष प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुनंदा जगताप, सचिव डॉ. संध्या वारद यांसह रोटरॅक्ट क्लब ऑफ आर्यावर्तचे अध्यक्ष आदित्य शास्त्री, सचिव कृष्णकांत अंधारे, उपाध्यक्ष काका सुरवसे, कोषाध्यक्ष रोहित जाधव, चैतन्य मुंडे , कृष्णा गिरी, विजय मेटे आदींची उपस्थिती होती. सोबतीला आई पार्क स्कुलचे विद्यार्थी, सर्व स्टाफही उत्साह वाढविण्याचे काम करत होता. विविध, आकर्षक फुलांसह नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. आई पार्कच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
रोटरॅक्ट क्लब ऑफ आर्यावर्त लातूरच्या वतीने नैसर्गिक रंग आणि फुलांनी रंगपंचमी साजरी
