शिवसेनेच्या नेत्या, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा कथित मॉर्फ व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. म्हात्रे यांनी याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.हा व्हिडीओ मॉर्फ केला असल्याचा दावा शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांनी केला आहे. सुर्वे यांच्या मुलांने या व्हिडिओबाबत आज अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. दहिसर पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
शीतल म्हात्रे यांच्या या व्हिडिओचे आज विधीमंडळात पडसाद उमटले. यावरुन महिला आमदार भडकल्या. त्यांनी याप्रकरणाच्या मास्टरमाईंडचा शोध घेण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.
या विषयावरुन विधीमंडळात खंडाजंगी झाली. शिवसेनेच्या yamini jadhav यांनी या विषयावर विधीमंडळात पाँइट आँफ इन्फोर्मेशन मांडली. या विषयावर आमदार भारती लव्हेकर, मनिषा चौधरी यांनीही सभागृहाचे लक्ष वेधले.
सर्व कंपन्यांची चौकशी लावा..
भाजपच्या आमदार भारती लव्हेकर म्हणाल्या, “तुमच्या राजकारणासाठी तुम्ही बायकांचा वापर करणार का? याबाबत एसआयटी चौकशी करा. या सगळ्यांचे मोबाईल जप्त करा जेणेकरून संपूर्ण माहिती मिळेल. ज्या कंपन्या, एजन्सी अशा पद्धतीचे काम करत आहेत, त्या सर्व कंपन्यांची चौकशी लावा, तरच संपूर्ण गोष्टी समोर येतील,”
कधी कारवाई होणार…
यामिनी जाधव म्हणाल्या, “कालपासून एका प्रतिष्ठित महिला, माजी नगरसेविकेच्या बाबतीत रॅलीतीलमॉर्फिंग करुन तो व्हायरल करण्यात आला आहे. त्या महिलेने कितीवेळा मीडियासमोर येऊन याबाबत स्पष्टीकरण द्यावं. यावर कधी कारवाई होणार. या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बरबाद होईल,”