मुक्ताईनगर तालुक्याच्या मध्यप्रदेशातील सीमेवरून मोठया प्रमाणात गुटखा वाहतूक होत असल्याचा आरोप ncp नेते आमदार eknath khadse यांनी विधानपरिषदेत केला होता. जिल्ह्यातील पोलीस खाते जागे झाले अन् गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक मुक्ताईनगर तालुक्यात पकडला. विशेष, म्हणजे आमदार खडसे यांनीही पोलीस स्टेशनला जाऊन याची पाहणी केली.
पोलीस (Police) प्रशासनाला न जुमानता मुक्ताईनगर येथून गुटखा वाहतूक होत अडल्याचे दिसून आले. या बाबत एकनाथ खडसे यांनी गेल्या आठवड्यात विधानपरिषदेत जोरदार आवाज उठविला होता. त्यानी गृह विभागाला व अन्न औषधी विभागाला चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे सर्व विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने एचआर ५५ एम-४९८० क्रमांकाचे आयशर वाहन मुक्ताईनगर येथील बोदवड चौफुली जवळील उड्डाण पुला खाली पकडले. यात राज्यात प्रतिबंधीत असलेल्या विमल गुटख्याचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आला. त्याचे बाजार मूल्य 56 हजार रुपये आहे. अवैध बाजारात विक्रीची किंमत करोडो रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गुटखा पकडल्याची माहिती मिळताच आमदार खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कारवाई करणाऱ्या अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याचे अभिनंदन केले. तर या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.