आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला आहे. “मी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा देत आहे, तो स्वीकारावा,” असे रेड्डी यांनी खर्गे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे.
किरण कुमार रेड्डी यांनी २०१४ मध्येही काँग्रेसचा राजीनामा दिला होता.ap विभाजन करुन तेलंगणा राज्याची निर्मिती होत असताना रेड्डी यांनी नाराजी व्यक्त करुन राजीनामा दिला होता. त्यांनी जय समैक्य आंध्र पार्टी या पक्षाची स्थापना केली होती. पण २०१८ मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.आंध्रप्रदेशाचे विभाजन होण्यापूर्वी किरण कुमार रेड्डी हे काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री होते. ते दिवगंत मुख्यमंत्री वाईएस राजशेखर रेड्डी यांच्या कार्यकाळातही मंत्री होते.त्यानंतर ते काही काळ विधानसभा अध्यक्षही होते. किरण कुमार रेड्डी यांचे वडील नल्लारि अमरनाथ रेड्डी हे माजी पंतप्रधानindira gandhi आणि नरसिंह राव यांचे निकटवर्तीय होते.
किरण कुमार रेड्डी यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसचे नेते, खासदार मणिकम टागोर यांनी टीका केली आहे. “ज्या व्यक्तींनी पक्षाकडून सर्व काही मिळवलं आणि आंध्रप्रदेश काँग्रेस संपवली, ते आता भाजपच्या वाटेवर आहे,” अशी टीका मणिकम टागोर यांनी केली आहे.