कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नेते पुत्तण्णा यांनी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एक दिवसापूर्वी पुत्तण्णा यांनी ‘वैयक्तिक कारणास्तव’ भाजपच्या एमएलसी आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
भाजपकडून चार वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिलेले पुत्तण्णा कॉंग्रेस सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला, एलओपी सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी काँग्रेसचे सदस्यत्व दिले. पुत्तण्णा हे चार वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. त्यांनी बेंगळुरू अर्बन, बेंगळुरू ग्रामीण आणि रामनगरा जिल्ह्यांतील शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. पुत्तण्णा यांची ऑक्टोबर 2020 मध्ये विधान परिषदेवर पुन्हा निवड झाली आणि त्यांचा कार्यकाळ ऑक्टोबर 2026 मध्ये संपणार होता.
“आज मी या निर्णयापर्यंत पोहोचलो असून भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी माझा राजीनामा विधानपरिषदेच्या अध्यक्षांच्या कार्यालयाकडे सुपूर्द केला आहे.” असे पुत्तण्णा यांनी माध्यमांना सांगितले. तसेच, पुत्तण्णा यांनी अलीकडेच कर्नाटकातील सत्ताधारी भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ‘जी स्वप्ने घेऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला होता ते स्वप्न गुदमरल्यामुळे पूर्ण होऊ शकले नाही. सरकार जनतेचा एकही प्रश्न सोडवत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.दरम्यान, कर्नाटकात २०२३ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले आहेत. कर्नाटकात 224 जागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणआर आहे. काँग्रेस माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहे. दुसरीकडे, भाजपचे प्रमुख चेहरे माजी मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.