• Sun. May 4th, 2025

एकनाथ खडसेंची विधान परिषदेच्या गटनेतेपदी वर्णी

Byjantaadmin

Mar 10, 2023

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर राष्ट्रवादी कैाँग्रेसनं मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना याबाबतचे पत्रही देण्यात आले आहे. विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रतोद म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ खडसेयांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे. तसेच अनिकेत तटकरे यांच्याकडेही महत्वाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसेंच्या माध्यमातून जळगावमध्ये राष्ट्रवादीला अधिक बळ मिळेल आणि आगामी निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल, हे सर्व गणित पाहता त्यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय संघर्ष अनेकवेळा जळगावमध्ये पाहायला मिळतो. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानपरिषदेवर आमदार झाले. त्यानंतर आता त्यांच्यावर राष्ट्रवादी मोठी जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *