• Wed. Apr 30th, 2025

मुंबई आणि जामनगर येथून 120 कोटींचे एमडी ड्रग जप्त

Byjantaadmin

Oct 7, 2022

मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (NCB) पुन्हा मोठे यश मिळाले आहे. ब्युरोने गुजरातमधील जामनगर आणि मुंबई येथील एका गोदामातून 120 कोटी रुपयांचे 60 किलो अंमली पदार्थ मेफेड्रोन जप्त केले आहे. या प्रकरणी एअर इंडियाच्या माजी वैमानिकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

एनसीबीचे उपमहासंचालक एसके सिंह यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. सिंह यांनी सांगितले की, हे एमडी ड्रग मुंबई आणि जामनगर येथील गोदामातून जप्त करण्यात आले आहे. खबऱ्याच्या माहितीवरून गोदामावर छापा टाकण्यात आला. एनसीबीने या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मुख्य सूत्रधारासह सहा जणांना अटक केली.

एनसीबीचे डीडीजी सिंह म्हणाले की, सुरुवातीला जामनगरच्या नौदल इंटेलिजन्स युनिटने एमडी ड्रग्जच्या विक्री आणि खरेदीची माहिती दिली होती. या माहितीवरून एनसीबी आणि नेव्हल इंटेलिजन्स युनिटने संयुक्तपणे कारवाई केली. या माहितीवरून जामनगर येथून 10.350 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.

ऑगस्टमध्ये पालघरमध्ये 1400 कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आले होते
याआधी ऑगस्टमध्ये मुंबई पोलिसांनी शेजारच्या पालघर जिल्ह्यातून 1,400 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. जप्त केलेल्या ड्रग्सचे वजन 700 किलोपेक्षा जास्त होते. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ही कारवाई केली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed