मसलगा सरपंच, आधार ग्रुप ,पोलीस प्रशासन व छावा यांनी सापळा रचुन दारू केली जप्त
मसलगा:- दिनांक 07-03-2023 रोजी ठीक सायंकाळी 07:00वाजता मसलगा बसस्थानकावरती दारू विक्री होत आहे असे समजले असता मसलगा येथील सरपंच तसेच गावकऱ्यांनी चिंचोली पोलीस स्टेशनचे पोलीस जमादार सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधून ग्रामस्थांनी तसेच पोलीस प्रशासनाने दारू घेऊन येत असताना मसलगा बसस्थानकावरती लिंबराज नागनाथ बनसोडे यांना केले अटक यावेळी लिंबराज नागनाथ बनसोडे हा आपल्या स्वतःच्या गाडीवरती दारू घेऊन विक्री करत असलेले दिसून आले तेव्हा सर्व गावकरी तसेच पोलीस प्रशासनाने लिबराज बनसोडे याला लागलीच पकडले त्यावेळी त्याच्याजवळ देशी दारू शिमला संत्रा कंपनीच्या 90 एम एल च्या 30 बाटल्या 1050 रुपये चा माल व हिरो होंडा कंपनीची मोटर सायकल गाडी एच एफ डीलक्स गाडी एम एच 24 बी एन 75 65 नंबरची गाडी चाळीस हजार किमतीची अशी एकूण 41 हजार 50 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला व छापा टाकून सदरचा माल पंचासमक्ष जप केला यावेळी पोलीस जमादार सुनील पाटील,सोमवंशी व आ.भा .छावा संघटना निलंगा तालुका अध्यक्ष दास( भैया )साळुंके सरपंच गणेश शेळके ,उपसरपंच आशिष पाटील, आधार ग्रुप अध्यक्ष हरिदास साळुंके, आधार ग्रुप उपाध्यक्ष सतीश पिंड ,पोलीस पाटील संतोष नरहरे, नामदेव शिंदे ,दत्तात्रय पिंड ,हरी शिंदे, नितीन शिंदे ,सुदाम सुतार ,सागर शिंदे ,बबलू देशमुख ,तसेच सर्व गावकरी व पोलीस प्रशासनाचे तसेच नवयुगाचे गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले