लातुर:-शिवसेना लातूर जिल्ह्याच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना संपर्क कार्यालय लातूर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांचे उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला शोभाताई शिवाजीराव माने यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच माजी नगरसेविका संध्याताई आरदवाड यांचा वाढदिवस ही साजरा करण्यात आला यावेळी कामगार सेनेच्या महिला जिल्हा संघटिका सौ प्रीती ताई कोळी अलकाताई मुगळे यांच्या उपस्थितीत सदरील जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी साळुंके ताई, मीराताई माळी, शोभाताई लड्डा, सौ बाबळसुरे , सारिका कोळी, प्रियंका जाधव, विद्याताई नाईक नवरे, जयश्री जमालपुरे, अरुणा माने इत्यादी महिला उपस्थित होत्या यावेळी वरील सर्व महिलांचा सन्मान करत असताना शोभाताई माने म्हणाले की या धावत्या युगामध्ये महिलांनी स्वावलंबना बरोबर संस्कृतीचे जतन करणं अत्यंत गरजेचे असून महिलांनी एकत्र येऊन न्याय हक्कासाठी लढा दिला तर निश्चितच न्याय मिळेल आज महिलाही आबला नसून सबला झालेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये गरुड झेप घेत असताना महिला आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये संधीच सोनं करत असलेले दिसून येत आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांना योग्य मानसन्मान मिळणं हे खूप अवघड काम होतं परंतु राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, आद्य शिक्षिका सावित्री ताई फुले, रमामाई ,यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर आपण सर्वांनी कार्य केलं तर निश्चितच महिलांना चांगले दिवस येतील असे विचार शोभाताई माने यांनी मांडले. आत्महत्येचा विचार मनातून काढून साडेसातशे कुटुंबाची माई होता येतं हे आदर्श उदाहरण स्वर्गीय सिंधुताई सपकाळ माई यांच्या रूपाने आपल्याला घेता येईल म्हणून संकटाला घाबरून न जाता धैर्यन सामना केला पाहिजे. यावेळी प्रीतीताई कोळी,आलकाताई मुगळे ,यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रीतीताई कोळी म्हणाल्या की शिवसेना हे कुटुंब असून शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या सोबत काम करत असताना कसल्याही प्रकारचा भेदभाव दुजाभाव आम्हाला दिसून येत नाही, शिवाय ज्या ज्या ठिकाणी आम्ही मदतीची अपेक्षा करू त्या त्या ठिकाणी जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने धावून येतात महिलाचे प्रश्न सोडवतात आणि म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे हात बळकट करत असताना लातूर जिल्ह्यामध्ये महिलांचे असणारे असंख्य असे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास महिला दिनाचे औचित्य साधून प्रीती ताई कोळी यांनी दिला. तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अलकाताई मुगळे यांनी केले.