लातूर मध्ये शाहीन इन्स्टिटयूट ची सुरवात
लातुर(प्रतिनिधी):- भारतातील NEET चे शिक्षण देणारी सुप्रसिद्ध “शाहीन इन्स्टिट्यूट” ची सुरवात लातूर मध्ये झाली आहे.
शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधून दरवर्षी साधारणतः 400 ते 450 विद्यार्थी MBBS (गव्हर्नमेंट फ्री सीट) प्रवेशसाठी तसेच 500 ते 600 विद्यार्थी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पात्र होतात. लातूर येथील शाहीन इन्स्टिट्यूट च्या शाखेत उच्च प्रतीचे शिक्षण लातूरमधील विद्यार्थ्यांना मिळणार आहे अशी माहिती लातूर ब्रँच चे मुख्य समन्वयक मोईज शेख व अल्ताफ शेख यांनी दिली.
या संदर्भात 4 मार्च रोजी लातूर येथील एम.के. फंक्शन हॉलमध्ये बैठक झाली. लातूर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी या मध्ये सहभाग घेतला. या बैठकीत शिक्षक, व्याख्याते, शैक्षणिक संस्थाचालक, स्थानिक नेते, संघटनेचे नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थ्यांचे पालक सहभागी झाले होते. लातूर शहराव्यतिरिक्त औसा, निलंगा येथूनही अनेक मान्यवर आले होते. यावेळी लातूरच्या शाहीन संस्थेचे समन्वयक मोईज शेख यांनी ही संस्था लातूरला का आणण्याची गरज होती यावर प्रकाश टाकला. सोलापूर येथील मोटिव्हेशनल स्पीकर मुजावर सर यांनी सर्वांना शिक्षणाचे महत्त्व व मोबाईलचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात मौलाना इस्रायल रशिदी यांनी इस्लामच्या दृष्टिकोनातून शिक्षणाचे महत्त्व सांगितले. यावेळी प्राध्यापक इलाही मसुमदार, प्राध्यापक एम.बी.पठाण, अझीम कॉलेज औसाचे संचालक तथा औसाचे माजी नगराध्यक्ष अफसर बाबा शेख आदी यांनीही मार्गदर्शन केले. लातूरच्या शाहीन संस्थेचे संचालक अल्ताफ शेख सर यांनी प्रवेश प्रक्रियेची माहिती देत सर्वांचे आभार मानले.