मुंबई, 06 मार्च : ‘खेडमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेला शिवसैनिकांचा महापूर आला होता. राष्ट्रवादीची गर्दी बोलवायची अशी शिवसेनेवर अजून अद्याप वेळ आलेली नाही. मोठ्या प्रमाणात लाखो शिवसेनेचे कार्यकर्ते हे कोकणात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे आहेत. हे कोकणी विकत घेतलेली माणसं नाही आहेत. या सभेने महाराष्ट्राचा कौल झाला आहे, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेच आहे’ अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला फटकारलं.
खेडमधील उद्धव ठाकरे यांच्या सभेवरून शिंदे गट आणि भाजपने टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं.
‘काल कोकणातल्या अति विराट सभा ही त्या ठिकाणी झाली, त्यानंतर अनेकांचे बोल बिघडले. तुम्ही आता स्वीकारला पाहिजे धनुष्यबाण चिन्ह शिवसेना नाव जर तुम्ही चोरलं असेल तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात लाखो शिवसेनेचे सैनिक हे कोकणात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे आहेत. ही कोकणी माणसं विकत घेतलेली नाही. कालच्या सभेने महाराष्ट्राचा कौल झाला आहे, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेच आहे, असं राऊतांनी शिंदे गटाला सुनावलं.
‘आता तुम्ही आव्हान सभा किंवा कोणतीही सभा घेतली तरी सुद्धा हे खोक्याचा राजकारण आहे. कोकण आणि शिवसेना हे अतुट नात आहे ते काल स्पष्ट दिसलं त्यानंतर मालेगाव सभा होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रभर देखील अशा सभा होणार आहेत. कालच्या सभेतून स्पष्ट झालं की नागरिकांचा किती राग आहे, असंही राऊत म्हणाले.
मिंदे गटाचे स्क्रिप्ट हे भाजपने लिहून दिलेला असतो. त्यामुळे त्यांनी म्हटलेल्या गोष्टींवरती बोलणं मला गरजेचे वाटत नाही, असा टोलाही राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.
‘आम्ही शिमगा करत नाही जनता भाजपा शिवसेनेच्या नावाने शिमगा करत आहे. विरोधात बोलणाऱ्या लोकांवरती हल्ले सुरूच आहेत म्हणून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कळवलेला आहे, देशाची परिस्थिती काय आहे. सरकार विरोधात बोलन गुन्हा ठरत आहे आणि त्यांच्यावरती ईडी केसेस पडत आहे. याप्रमाणे ईडी आणि सीबीआय राजकीय विरोधकांवरती केसेस करत आहेत हे आज सरकारमध्ये तालिबियन आणि आतंकवादी यांच्यासारखे होत आहे, अशी टीकाही राऊतांनी केली.
राहुल गांधी यांनी केंब्रिजमध्ये जे भाष्य केलं. त्याच्याशी मी सहमत आहे की लोक ग्रंथाचा ऱ्हास होत चाललेला आहे, असंही राऊत म्हणाले.