• Thu. May 1st, 2025

पुण्याचा सुहास घोडके ठरला सिद्धेश्वर केसरी : मनपाचे ५१ तोळ्याचे चांदीचे  कडे गणेश काळे यांना

Byjantaadmin

Mar 6, 2023
पुण्याचा सुहास घोडके ठरला सिद्धेश्वर केसरी
मनपाचे ५१ तोळ्याचे चांदीचे  कडे गणेश काळे यांना
दीपक सगरे यांना स्व.सुधाकरराव कोकाटे यांच्या स्मरणार्थ चांदीचे कडे  स्व. ज्ञानोबा गोपे यांच्या स्मरणार्थ  पंकज पवार यांना २१ तोळे चांदीचे कडे
    लातूर/प्रतिनिधी:ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत पुणे येथील पहेलवान सुहास घोडके याने सिद्धेश्वर केसरीचा बहुमान पटकावला.देवस्थानच्या वतीने चांदीची गदा देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.
      सिद्धेश्वर यात्रेतील कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून मल्ल सहभागी होतात.यावर्षी देखील मोठ्या संख्येने मल्लांनी सहभाग नोंदवला.रात्री उशिरापर्यंत कुस्ती स्पर्धा सुरू होती.अंतिम लढतीत पुणे येथील सुहास घोडके याने प्रतिस्पर्ध्याला चित्रपट करत सिद्धेश्वर केसरीच्या किताबावर नाव कोरले आणि देवस्थानच्या वतीने दिली जाणारी चांदीची गदा पटकावली.
   लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने दिले जाणारे ५१ तोळे चांदीचे कडे देवंग्रा येथील पहिलवान गणेश काळे यांनी मिळवले.स्व. सुधाकरराव कोकाटे यांच्या स्मरणार्थ अमर कोकाटे यांच्या वतीने दिले जाणारे चांदीचे कडे शिवली येथील पहेलवान दीपक सगरे याला मिळाले.स्व.ज्ञानोबा गोपे यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे २१ तोळे चांदीचे कडे साई येथील पंकज पवार या पहेलवानाने मिळवले.
     कुस्ती स्पर्धा पार पडल्यानंतर देवस्थानचे प्रशासक तथा निरीक्षक सचिन जांबुतकर,मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे,ज्येष्ठ विश्वस्त विक्रमतात्या गोजमगुंडे, अशोक भोसले,पोलीस निरीक्षक प्रेमसागर माकोडे यांच्या हस्ते सिद्धेश्वर केसरी ठरलेल्या सुहास घोडके यांना चांदीची गदा व विजेत्या पहेलवानांना चांदीचे कडे प्रदान करण्यात आले.
    यावेळी ओम गोप,विशाल झांबरे,आशिष क्षिरसागर,शिवाजी काळे,शरद पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मैदानावर प्रेक्षकांनी दिवसभर गर्दी केली होती.
https://jantaexpress.co.in/?p=4695

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *