आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची एमडीए शैक्षणिक संकुलास भेट
विमा योजनेचे कौतूक
लातूर/प्रतिनिधी:माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी कोळपा येथील एमडीए शैक्षणिक संकुलास भेट देऊन तेथे चालणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली.संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विमा योजनेचे त्यांनी कौतूक केले.
एमडीए फाउंडेशनच्या वतीने कोळपा येथे एमडीए रॉयल इंटरनॅशनल स्कूलसह विविध शैक्षणिक उपक्रम चालविले जातात.आ.निलंगेकर यांनी या सर्व उपक्रमांची माहिती घेतली. संस्थेचे संचालक महेश आंबेकर, दिनेश आंबेकर,यशवंत आंबेकर यांनी त्यांना माहिती दिली.
संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना अवघ्या १ रुपयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिले जाते.संस्थेने यावर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी दिविजा देवअमृत शिष्यवृत्ती योजना,दिविजा देवअमृत आरोग्य योजना,दिविजा देवअमृत वैद्यकीय सहाय्यता निधी योजना व दिविजा जीवन सुरक्षा विमा योजना विद्यार्थ्यांसाठी लागू केली आहे.आरोग्य योजनेतून दरवर्षी ३ लाख रुपयांपर्यंतचे उपचार संस्था मोफत उपलब्ध करून देणार आहे.वैद्यकीय सहाय्यता निधी मधून उपचारांसाठी मदत केली जाणार आहे.अपघाती मृत्यू झाल्यास विमा योजनेअंतर्गत १० लाख रुपयांचे विमा संरक्षण संस्थेने उपलब्ध करून दिले आहे. या सर्व योजनांमधून एकत्रित रित्या २२३ कोटी २५ लाख रुपयांचा लाभनिधी संस्था व विमा कंपनीच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी लागू करण्यात आला आहे.दिड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असल्याची माहिती महेश आंबेकर यांनी दिली
शैक्षणिक संकुलात चालणाऱ्या विविध उपक्रमांची पाहणी करून आ.निलंगेकर यांनी समाधान व्यक्त केले.विद्यार्थ्यांना विमा कवच उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेबद्दल त्यांनी आंबेकर बंधूंचे कौतुकही केले.
प्रारंभी संस्थेच्या वतीने आ. निलंगेकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी तज्ञ संचालक प्रा.ओमप्रकाश झुरूळे,प्रा.संजय क्षीरसागर ,प्रा.रवि कुऱ्हाडे,इमाम शेख,अश्विनी कांबळे यांच्यासह संस्थेतील शिक्षक,शिक्षिका आणि विद्यार्थ्यां व पालक यांची उपस्थिती होती.
https://jantaexpress.co.in/?p=4695