शंखी गोगलगाय व अतिवृष्टी च्या मदतीपासुन वगळल्याने औराद येथे उद्या सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा चक्का जाम व रास्ता रोको
निलंगा:-शंखी गोगलगाय व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले बाबत,नुकसान भरपाई चा पंचनामा करुनही नुकसान भरपाई योजनेमधून अंबुलगा (बुं), निटुर, औराद, हलगरा ,कासार बालकुंदा, कासार-सिरसी हे महसूल वगळण्यात आल्यामुळे सरसकट मदतीसाठी औराद येथे शेळगी मोड निलंगा- बिदर रस्त्यावर चक्का जाम व रास्ता रोको उद्या दिनांक 07.10.2022 रोजी सकाळी ठीक 10:10 मिनिटानी करण्यात येणार आहे.
तरी सर्व शेतकरी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी राज्य शासनाविरोधी आंदोलनासाठी हजर रहावे.
यावेळी जेष्ठ नेते मा. जि.प.अध्यक्ष पंडितराव धुमाळ, जिल्हा उपाध्यक्ष इंजि. विनायक (आण्णा) बगदुरे, अंगद जाधव, विधानसभा अध्यक्ष सुधीरदादा मसलगे, विधानसभा कार्याध्यक्ष संदिप मोरे, महिला जिल्हा पदाधिकारी महादेवीताई पाटील, कोमलताई देशपांडे, संगिताताई कदम,युवक तालुकाध्यक्ष उल्हास सूर्यवंशी, युवक कार्याध्यक्ष महेश चव्हाण तसेच युवकचे जिल्हा पदाधिकारी महेश मसलगे, सुग्रीव सूर्यवंशी, उदय मेकाले, निलंगा युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे, राम पाटिल, गफ्फार लालटेकडे, व्यंकट सूर्यवंशी,सामाजिक न्याय चे लक्ष्मण कांबळे, धोंडिराम वाघमारे, संजय सोनकांबळे, मनोज स्वामी, औराद युवक शहराध्यक्ष सिध्दीकी मुल्ला ओबीसीचे बालाजी जोडतल्ले, किसान सेल चे सुरेश रोळे,विद्यार्थी चे रोहित पाटिल, सोशल मिडिया चे प्रदेश सरचिटणीस किरण सोळुंके यांनी मोठ्या प्रमाणात हजर राहुन शेतकरी वर्गास न्याय मिळवुन देण्यासाठी चक्का जाम आंदोलनास हजर रहाण्याचे आवाहन केले आहे.