काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश करून सिमोल्लंघन
बसपूर येथील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार निलंगेकर यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
निलंगा(प्रतिनिधी)निलंगा तालुक्यातील बसपूर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा तालुक्यातील गटबाजीला कंटाळून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.यावेळी सर्व उपस्थित भाजपा प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना आमदार निलंगेकर यानी दस-याच्या शुभेच्छा दिल्या.
विलास संदीपान पाटील, संजय आण्णाराव वाडीकर, राजेंद्र दिगंबर बिरादार , समाधान रामभाऊ बिरादार,रामभाऊ बिरादार, किरण व्यंकटराव बिरादार, परमेश्वर गणपती कुमठे, प्रताप दिलीप बिरादार, दत्ता व्यंकट सोनटक्के, ओमकार कडाजी क्षिरसागर, सुनील संदीपान कुमठे आदी काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विस्वास ठेवून भाजपात प्रवेश केला आहे.