• Wed. Apr 30th, 2025

शेतकऱ्यांच्या पाठिंब्याने डॉ निलंगेकर कारखाना यशस्वी वाटचाल करेल-आ.संभाजी पाटील निलंगेकर

Byjantaadmin

Oct 6, 2022

शेतकऱ्यांच्या पाठिंब्याने डॉ निलंगेकर कारखाना यशस्वी वाटचाल करेल-आ.निलंगेकर

दसरा मुहर्तावर रोलर पुजनाचा कार्यक्रम

निलंगा(प्रतिनिधी)यावेळी प्रमुख उपस्थित ओंकार कारखान्याचे चेअरमन बाबुराव पाटील बोत्रे पाटील, प्रदेशसचिव अरविंद पाटील निलंगेकर, माजी जि.प. अध्यक्ष मिलिंद लातुरे, ॲड. संभाजीराव पाटील , जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरव, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन दगडू साळुंके, जयश्रीताई पाटील, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, शंकरराव पाटील , शेषेराव ममाळे, प्रल्हाद बाहेती, माजी जि.प. सदस्य संतोष वाघमारे, प्रशांत पाटील, डॉ. लालासाहेब देशमुख, हावगिरराव पाटील,अॕड विरभद्र स्वामी, इरफान सय्यद अदी पदाधिकारी होते.

येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या पाठिंब्याने डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना यशस्वी वाटचाल करेल असे प्रतिपादन आमदार निलंगेकर यानी विस्वास उपस्थित शेतकऱ्यांना देत दस-याच्या मुहर्तावर रोलर पुजन केले असून प्रमुख उपस्थित चेअरमन बाबुराव बोञे पाटील हे होते.

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लिज ओंकार साखर कारखाना प्रा. लि. कारखान्याच्या गाळप हंगाम २०२२-२३च्या रोलरचे पूजन विजयादशमीच्या मुहूर्तावर माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले डॉ शिवाजीराव पाटील कारखाना शेतकरी हितासाठी सुरूञ करण्यात आला असून शेतकरी हित सर्वोतोपरी जोपासण्यात येईल शेतकऱ्यांचा आशीर्वाद पाठीशी असल्यास कारखाना निश्चितपणे यशस्वी वाटचाल करेल आणि तसेच पुढील वर्षात कारखाण्याचा डीस्टेलरी प्रकल्प सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी दिली.

भाजपा युवा शहरध्यक्ष तम्मा माडीबोने,माजी उपनगरध्यक्ष मनोज कोळ्ळे,भाजपा युवा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील,अप्पाराव सोळुंके,सुमीत इनानी,नागनाथ पाटील,विष्णू ढेरे,माधव फट्टे,किशोर लंगोटे, प्रदीप पाटील,आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed