जागृती शुगरने १० वर्षात प्रगती करत उस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले
विकास ही मांजरा परिवाराची बांधिलकी
४ वर्ष ११ महिने आम्ही समाजकारण तर १ महिना राजकारण आम्हीं करतो
माजी मंत्री जागृति शुगर चे संस्थापक दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन
जागृति शुगर चा ११ वा बॉयलर व गळीत हंगामाचा विजयादशमी दिवशी शानदार सोहळ्यात शुभारंभ
आसवणी प्रकल्प चाचणी बॉयलर अग्निप्रदिपण संपन्न
जागृती शुगर चे चालु हंगामात ८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळपाचे उद्दिष्ठ
लातूर :-मांजरा साखर परिवारातील सर्वच साखर कारखान्यानी पाच हजार टन क्षमता गाळप वाढवल्याने चालु गाळप हंगामात आधीक गाळप होईल जागृति शुगर ची गेल्या १० वर्षाची प्रगती बघता या भागातील उस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्याबरोबरच शेतकऱ्यांना प्रगतीकडे घेवून जाण्यासाठी मोठा हातभार लावला असून विकास करणे ही आमची मांजरा परिवाराची बांधिलकी असून ४ वर्ष ११ महिने आम्ही समाजकारण करतो तर राजकारण फक्त १ महिना करतो असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी जागृती शुगर चे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी केले ते विजयादशमी शुभ मुहुर्तावर देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर कारखान्याच्या ११ व्या बॉयलर व गळीत हंगामाचा शुभारंभ व आसवणी प्रकल्प चाचणी बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ माजी मंत्री दिलीपराव देशमुख व सौ सुवर्णाताई दिलीपराव देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, माजी आमदार अँड त्रिंबक जी भिसे, जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, यशवंतराव पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, अँड श्रीपतराव काकडे,अभय साळुंके, विजयकुमार पाटील, रेणा चे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, जागृती शुगरचे संचालक दिलीप माने संचालक सूर्यकांत करवा, सरव्यवस्थापक गणेश येवले आदी मान्यवर उपस्थित होते
१० वर्षात उस उत्पादक शेतकऱ्यांनी उस,सहयोग दिला आम्ही विश्वास दिला
पुढे बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब म्हणाले की जागृती शुगर कारखाना १० वर्षापूर्वी सुरू केला या भागांतील शेतकऱ्यांनी उस दिला सहयोग दिला त्यामुळेच जागृति चे ब्रिद्य वाक्य आहे जागृती शेतकऱ्यांची प्रगती या वाक्या प्रमाणे आम्ही चांगल काम करण्याचा प्रयत्न करतोय असे सांगून या मागे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मोठी भूमिका राहिलेली आहे यापुढे राहील असे सांगून मांजरा परिवारातील विलास साखर कारखान्याने सर्वाधिक मराठवाड्यात अधीक भाव दिल्याने कारखान्याचे कौतुक केले तसेच यावर्षी आस्वणी प्रकल्प सुरु होत असल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक भाव मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या कामाची स्पीड, संकल्पना कार्याला दिला उजाळा
कार्यक्रमात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टी मुळेच जिल्ह्यातील विकासाचा कायापालट होऊ शकला बीड जिल्ह्यातील धनेगाव ते लातूर जिल्ह्यांतील धनेगाव बरेज साखळी उभी केली आज सगळीकडे चोहीकडे पाणी थांबले आहे हि संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी जी स्पीड वेग होता लोकनेते विलासराव देशमुख साहेब वेगळं व्यक्तिमत्त्व असणारे नेते होते त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात रोजगार हमी योजनेअंतर्गत लातूर ते कुर्डवाडी ४५० कोटी रुपये राज्य शासनाच्या तिजोरीतून खर्च करून ब्रॉडगेज लातूरला तयार करणारे, लातूरच्या कोरो नाच्या संकटकाळात मदतीला आलेले विलासराव देशमुख शासकिय मेडिकल महाविद्यालय रिसर्च सेंटर असे अनेक प्रकल्प ऊभे करणारे लोकनेते विलासराव देशमुख यांच्या कार्याचा उजाळा दिला देताच त्यावेळी उपस्थित उस उत्पादक शेतकरी गहिवरले
राज्य सरकारची ५० हजाराची घोषणा पदरात नाही हवेतच अशोकराव पाटील निलंगेकर यांची सरकारवर टीका
यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांनी जागृती शुगर साखर कारखान्याने आपल्या भागात चांगले दिवस आले आहेत चांगला भाव दिल्याने आर्थिक सुबत्ता मिळाली असून विकास कामे करणाऱ्या पाठीशी आगामी काळात ऊभे राहिले पाहिजे असे सांगून सत्तेवर आलेल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये नियमित परतफेड शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली पण पदरात पडले नाही असे सांगून ही घोषणा अजूनतरी हवेतच आहे अशी टीका केली.यावेळी माजी आमदार अँड त्रिंबक जी भिसे यांनी मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी जागृति शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांनी मागच्या १० वर्षात जागृति शुगर ने गाळप केलेल्या कार्याची माहिती दिली तसेच एफआरपी पेक्षा अधिक भाव देणारा जागृति कारखाना ठरला मराठवाड्यात ट्वेंटी वन शुगर, जागृती शुगर साखर कारखाने अधिक भाव देणारे ठरले असून मांजरा परिवारातील नियमाने कारखाना प्रशासनाचे कामकाज सुरू असून २०१७ साली कारखाना हा कर्जमुक्त झाल्याचे सांगीतले आगामी हंगामात ८ लाख मेट्रिक टन उसाचे उद्दिष्ठ असल्याचे सांगीतले
शेतकऱ्यांच्या पाठीशी जागृती शुगर जागृतीच्या अध्यक्षा सौ गौरवी भोसले (देशमुख) यांचे प्रतिपादन
यावेळी जागृती शुगर च्या अध्यक्षा सौ गौरविताई अतुल भोसले (देशमुख) यांनी आपल्या संदेशात म्हटले की मागच्या १० गाळप हंगामात उस उत्पादक शेतकऱ्यांनी जे सहकार्य केले उस वेळेवर दिला आम्हीं तुमचा विश्वास संपादन करू शकलो भविष्यात अधिक भाव देण्याचा प्रयत्न जागृती शुगर कारखाना करणार आहे जागृती शुगर ने नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जे जे चांगल करता येईल अधिक भाव देण्याचा प्रयत्न केला आहे असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत
जागृती शुगर च्या वतीने मान्यवरांचा सत्कार
यावेळी युनिव्हर्सल इंडस्ट्रीज चे चेअरमन प्रदीप ढोकरे, जागृति शुगर चे माजी प्रकल्प व्यवस्थापक सुनीलकुमार देशमुख, कुर्मदास इंडस्ट्रीज चे अंकुश बनकर, जय गोरे यांचा उत्कृष्ठ कार्यामुळे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला उस गाळप विक्रमी उत्पादन केलेल्या उस उत्पादक शेतकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला
कार्यक्रमास माजी आमदार धर्माजी सोनकवडे, मल्लिकार्जुन मानकरी, अजित बेलकोने, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, दिलीप पाटील नागराळकर, संचालक मारोती पांडे, अनुप शेळके जयेश माने, व्यंकटराव बिरादार, कल्याण पाटील, प्रीती चंद्रशेखर भोसले, मीडिया प्रमुख हरीराम कुलकर्णी, शिवाजीराव केंद्रे, आबासाहेब पाटील, अजित माने, डी एन शेळके, दिलीप पाटील रेणापूरकर, उदयसिंह देशमुख, गोविंद राव भोप निकर, डॉ अरविंद भातंब्रे, सचिन दाताळ, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, माजी सभापती राजकुमार जाधव, माजी सभापती मधुकरराव पाटील,जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव,रेणा चे एम डी मोरे, मांजरा चे एम डी रनवरे, विलास २ चे एम डी पवार, एल बी आवांळे, रामदास पवार, बाबुराव बिराजदार भगवानराव पाटील विजयनगर कर, चांदपाशा इनामदार ,सतीश पाटील, अँड बाबासाहेब गायकवाड, गजानन भोपनिकर, बालाजी कारभारी, बालाजी साळुंखे, विजय कदम , बालाजी बोबडे, वैजनाथ लुल्ले, अँड सूतेज माने, संजय बिराजदार, विजय पाटील, अनिल पाटील, राम भंडारे शेषराव पाटील, दत्ता कुलकर्णी, राम भंडारे, विकास पाटील, सुनील बोरोळे, रामकिशन गड्डीमे,, व्यंकटराव भोसले, यांच्यासह उस उत्पादक शेतकरी सभासद मोठया संख्येने उपस्थित होते
हरवेस्टर चे पूजन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख संचालिका सौ सुवर्णा ताई देशमुख यांच्या हस्ते
जागृती शुगरचे उस उत्पादक शेतकऱ्यांना यावेळी जिल्हा बँकेच्या वतीने हार्वेस्टर चे वितरण करण्यात आले तत्पूर्वी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यावेळी जागृती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, संचालक दिलीप माने संचालक सूर्यकांत करवा सरव्यवस्थापक गणेश येवले आदी मान्यवर उपस्थित होते