अवैध दारू, ताडी विक्रेत्यांवर कारवाई करण्याची महिलांची मागणी.
निलंगा:- शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे राजरोसपणे अवैध दारू व ताडी विक्री केली जात असून या विक्रेत्यावर तातडीने कारवाई करावी व तळीरामांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील महिलांनी पोलीस निरीक्षक निलंगा यांना दिलेल्या निवेदनात केले आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या दादा पीर दर्गा परिसरातील वस्तीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैद्य रित्या दारू व ताडीची विक्री केली जात आहे. त्यामुळे दिवसा व रात्री दारुड्यांची वर्दळ या भागात मोठ्या प्रमाणात वाढले असून दारु व ताडी पिऊन झिंगलेले लोक मोठ्याने आराडाओरड करीत धुमाकूळ घालत आहेत.नशेतील लोकांना नीट चालता येत नसल्याने कोठेही अस्ताव्यस्तरित्या रस्त्यावर पडून गोंधळ घालत आहेत. या या भागातील महिलांना, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना व लोकांना दारुड्या लोकांचा त्रास होतो आहे. या लोकवस्तीला लागून एका बाजूला पवित्र असा दादापीर दर्गा आहे तर दुसऱ्या बाजूला विविध शासकीय कार्यालय आहेत. त्यामुळे या भागात लोकांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते. पोलिसांनी या निवेदनाची दखल घेऊन तातडीने या भागातील अवैद्य दारू व ताडी विक्री बंद करावी व अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करून तळी रामाचा बंदोबस्त करावा अशी मागणी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे निलंगा यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर ललिता टाक, आशा जाधव, उषा पवार , इंदरकौर टाक, जयाबाई कांबळे, महादेवी सकट, आशा लोंढे, रेणुका जाधव, राणी माने, संगीता घोडके, आरती जाधव, नटाबाई कांबळे, गायत्री कांबळे, लक्ष्मीबाई काळे आदींसह मोठ्या प्रमाणात महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
https://jantaexpress.co.in/?p=4534