• Wed. Apr 30th, 2025

विठ्ठल मंदिरात सजावट केलेले एक टन द्राक्षे अर्ध्या तासात गायब, चौकशीची मागणी

Byjantaadmin

Mar 3, 2023

(Amalaki Ekadashi)  एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिराला द्राक्षे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. एक टन द्राक्षांचा वापर विठ्ठल रुक्मिणी गाभारा सजवण्यात आला होता. मात्र केवळ अर्ध्या तासात ही सर्व द्राक्षे गायब झाल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. आज (3 मार्च) सकाळी सहा वाजता सजावटीनंतर भाविकांना दर्शन सुरु झाले आणि अर्ध्या तासात एक टन द्राक्षंपैकी एकही मणी शिल्लक राहिला नाही.

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तब्बल एक टन द्राक्षांची सजावट

आमलिका एकादशीनिमित्त पुण्यातील भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तब्बल एक टन द्राक्षांची सजावट केली होती. केवळ अर्ध्या तासात ही सर्व द्राक्षे गायब झाल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. आज सकाळी सहा वाजता सजावटीनंतर भाविकांना दर्शन सुरु झाले. अर्ध्या तासात एक टन द्राक्षंपैकी एकही मणी शिल्लक राहिला नव्हता. दर्शनाला आलेल्या भाविकांनी ही द्राक्षे खाल्ल्याचा दावा केला जात आहे. मात्र दर्शन रांगेच्या बाहेर लावलेले शेकडो द्राक्षांचे घड कोणी पळवले याची चर्चा सुरु आहे.

चौकशी करण्याची मागणी

Amalaka Ekadashi 2023 Maharashtra Pandharpur News Grapes Decoration at Vitthal Rukmini Temple 1 ton Garapes disappeared within half an hour inquiry demanded अहो आश्चर्यम! विठ्ठल मंदिरात सजावट केलेले एक टन द्राक्षे अर्ध्या तासात गायब, चौकशीची मागणी

द्राक्षे हा विषय साधा असला तरी मंदिरात ज्या पद्धतीने हा प्रकार घडला आहे याची चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे. ज्या भाविकांनी ही द्राक्ष सजावटीसाठी दिले त्याच्याही भावना या प्रकाराने दुखावल्या असून या प्रकारात नेमके कोण आहे याचा शोध मंदिर प्रशासनाने तातडीने लावावा आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत अशी मागणी विट्ठल भक्तांनी केली आहे.

एकादशीनिमित्त पंढरपूरला दरवर्षी आकर्षक सजावट करण्यात येते. हंगामी फळा, फुलांनी मंदिराची सजावट करण्यात येते. maharashtraातील लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाच्या सजावटीसाठी भाविकांकडून सेवा देण्यात आहे. आज फाल्गुन शुद्ध अर्थात आमलकी एकादशी आहे, यालाच आवळ्याची एकादशीची म्हणाले जाते. विठ्ठल भक्तांनी निसर्गाचा सांग वाढवण्यासाठी या एकादशीचे खास महत्व वारकरी संप्रदायात मानले जाते. pune  आणि बारामती येथील भाविक बाबासाहेब शेंडे, पूनम शेंडे आणि सचिन चव्हाण यांनी ही द्राक्ष सजावट केली आहे. हजार किलो द्राक्षांचा वापर विठ्ठल रुक्मिणी गाभारा सजवण्यासाठी करण्यात आला होता. सध्या आपल्या बागेत पिकलेली द्राक्षे देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी अनेक भाविक येत असतात, मात्र नानासाहेब पाटील यांनी थेट द्राक्ष आणि फुलांच्या मदतीने आकर्षक सजावट केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed