विशाल गिरी प्रस्तुत लव्हेरिया चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन
लातूर/प्रतिनिधी:गौरी इंटरटेनमेंट आणि विशाल गिरी यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असणाऱ्या लव्हेरिया या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन चित्रपटातील प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत लातूर येथे संपन्न झाले.
या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण जिल्ह्यातच होणार आहे.स्थानिक कलाकारांनाही त्यात संधी देण्यात आलेली आहे.लातूर मधील पूजा शिंदे या तरुणीला मुख्य भुमिका देण्यात आलेली आहे.पूजा शिंदे ही विशाल गिरी ॲक्टिंग स्कूलची विद्यार्थीनी आहे.ॲकॅडमी मधील २२ कलाकार या चित्रपटात काम करत आहेत.
प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारे विनोदी कथानक या चित्रपटात असणार आहे,अशी माहिती दिग्दर्शक विशाल गिरी यांनी यावेळी बोलताना दिली.
चित्रपटातील प्रमुख कलाकार प्रसाद शिखरे,हर्षदा पाटील, वैष्णवी पाटील,दिनेश भुर्के यांच्यासह कलाकार आणि निर्मात्या सुनंदा तुगावकर,आलमला येथील प्रा.मालपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत पोस्टरचे प्रदर्शन संपन्न झाले.लातूरसारख्या शहरात आणि ग्रामीण भागात खूप मोठी संधी आहे.येथील कलाकारांमध्ये गुणवत्ता आहे. निर्माता व दिग्दर्शन करण्याचे कौशल्य लातूरमध्ये आहे.त्याचा
प्रत्यय हा चित्रपट पाहताना दर्शकांना येईल,असे प्रमुख कलाकारांनी यावेळी बोलताना सांगितले.लातूरकर कलेवर भरभरून प्रेम करतात.लव्हेरिया या चित्रपटास आणि कलाकारांनाही लातूरकरांनी असेच प्रेम द्यावे.सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पहावा,असे आवाहनही यावेळी निर्माता दिग्दर्शक विशाल गिरी व उपस्थित कलाकारांनी केले. यावेळी राम बोरगावकर,प्रविण जाधव,रामा यादव,रामहरी सोनवणे,रवी पोतदार,मोनालिसा बागल,दीपक घडवाल,अभिजीत सोनवणे,विकी अडवाणी,दिनेश भुरके यांच्यासह कलाकारांची उपस्थिती होती.
https://jantaexpress.co.in/?p=4531