• Tue. Apr 29th, 2025

चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या विजयाला बंडखोर उमेदवारामुळे ‘कलाट’णी

Byjantaadmin

Mar 2, 2023

कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणूक लागताच भाजप आणि महाविकास आघाडीकडून अनेकांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. कसब्यात काँग्रेसने रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देताच बाळासाहेब दाभेकारांनी बंडखोरी केली. त्यांचे बंड शांत करण्यास काँग्रेसला यश आले

चिंचवडमध्येही राष्ट्रवादीने nana kate  यांना उमेदवारी दिली. त्यानंतर तेथे प्रबळ दावेदार समजत असलेले राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी बंडखोरी केली. त्यांना शांत करण्यासाठी अजित पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रयत्न केले. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीला बसल्याचे आता दिसून येत आहे

मी कसा योग्य उमेदवार आहे, यासाठी राहुल कलाटे यांनी अनेक कारणे दिली. कलाटे म्हणाले होते की, “जनता माझ्यामागे आहे. २०१९ निवडणुकीत भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात जनतेने मला एक लाख १२ हजार मते दिली होती. त्यामुळे जनतेचा कौल मला आहे. जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी भरलेला उमेदवारी अर्ज माघार नाही,” अशी भूमिका कलाटे यांनी घेतली होती.

ajit pawar यांनी कलाटे यांना समजावून सांगण्याचा अनेकदा प्रयत्न केला. वेळप्रसंगी त्यांनी कलाटे यांना खडे बोल सुनावले होते. २०१९ मध्ये राष्ट्रवादीला उमेदवारी मिळाली होती. मात्र राष्ट्रवादीने उमेदवार न देता अपक्ष कलाटे यांना आघाडीने पाठिंबा दिला. त्यामुळे कलाटे यांना एक लाख १२ हजार मते मिळाली होती. हे त्यांच्या लक्षात येत नाही. बघू आता त्यांना किती मते मिळतात, असेही पवार जाहीर सभेत बोलले होते.

आता कसब्याचा निकाल आला आहे. तेथे बंडखोरी टळल्यामुळे थेट भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत झाली होती. त्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) ११ हजार ४० मतांनी विजयी झाले आहेत. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने तिरंगी लढत झाली. येथे आता भाजपच्या अश्विनी जगताप सर्व फेऱ्यांतून आघाडीवर आहेत. नाना काटे दुसऱ्या क्रमांवर तर अपक्ष rahul kalate तिसऱ्या क्रमांवर आहेत.

चिंचवडमध्ये २२ फेऱ्यानंतर जगताप यांना ७४१७४ मते, काटे यांना ६१८०४ मते तर कलाटे यांना २५८८४ मते मिळालेली आहेत. यातून महाविकास आघाडीत झालेल्या बंडखोरीमुळे भाजपला फायदा झाल्याचे दिसून येत आहे. सध्या मिळालेली काटे आणि कलाटे यांची मते एकत्र केली तर ८७ हजार ६८८ होतात. हा आकडा भाजपच्या उमेद्वारापेक्षा १३ हजार ५१४ इतका जास्त आहे. या स्थितीमुळे चिंचवडमध्ये अपक्ष राहुल कलाटे यांच्यामुळे निकालाला कलाटणी मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत अजित पवार यांनीही राहुल कलाटे यांची कानउघडणी केली आहे. पवार म्हणाले, “कलाटे २०१९ मध्ये मिळालेल्या एक लाख १२ हजार मतांच्या जोरावर बेडकासारखे फुगले होते. त्यांना वारंवार सांगितले की ती मते फक्त तुमची नसून आघाडीचीही आहेत. मात्र त्यांनी ऐकले नाही. त्यांना जनतेचा कौल पहायचा होता. आता त्यांना समजले असेल त्यांची खरी मते किती आहेत ते.”

चिंचवड मतमोजणी २८वी फेरी : अश्विनी जगताप यांना १ लाख ५ हजार १३८ मते, नाना काटे यांना ८१ हजार ८३१ मते, तर राहुल कलाटे यांना ३२ हजार १७८ मते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed