• Tue. Apr 29th, 2025

गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर:छत्रपती संभाजीनगरमध्ये चुलीवर भाकरी थापून केंद्र सरकारविरोधात आंदोलन

Byjantaadmin

Mar 2, 2023

केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावर चूल मांडून. त्यावर भाकरी थापून आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी गॅसच्या टाक्या वाजवून यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ‘कहा गये भाई कहा गये अच्छे दिन कहा गये, वा रे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल’ अशी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीला काँग्रेसकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दीड तास आंदोलन करण्यात आले. भाजपच्या या निर्णयामुळे सामान्यांना जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या विरोधात हे आंदोलन छेडल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे शहर अध्यक्ष युसूफ शेख यांनी दिली. ‘हुकूमशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, जनता के सन्मान मे काँग्रेस मैदान मे,’ ‘या सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

काँग्रेसचे शहराध्यक्ष युसूफ शेख, पवन डोंगरे, सरोज मसलगे, नामदेव पवार यांनी टाक्या वाजवत आंदोलन केले.यावेळी हातात बांगड्या दाखवून मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष हेमा पाटील, प्रदेश सरचिटणीस सरोज मसलगे, माजी जिल्हाध्यक्ष सुरेखा पानकडे, युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष वरुण पाथ्रीकर शहराध्यक्ष सागर नागरे, अनिस पटेल, भाऊसाहेब जगताप, इक्बाल सिंग गील, अतिश पितळे, सय्यद अक्रम, दीपाली मिसाळ आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत…
https://jantaexpress.co.in/?p=4469

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed