• Wed. Apr 30th, 2025

ऊसतोड करणारं हजारे दाम्पत्य एका रात्रीत फेमस कसं झालं?

Byjantaadmin

Feb 24, 2023

बीड : गेल्या काही दिवसांपूर्वी मनीषा हजारे आणि अशोक हजारे या ऊसतोड करणाऱ्या दाम्पत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बघता बघता मनीषा हजारे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ त्यांनी कर्नाटकातील एका कारखान्याच्या परिसरात ऊसतोडणी करण्यासाठी गेल्यानंतर शुट केला होता. हजारे दाम्पत्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचा शोध सुरु झाला होता. मनीषा हजारे आणि अशोक हजारे यांनी त्या व्हायरल झालेल्या रील्स मागची गोष्ट ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितली आहे.

मनीषा हजारे यांनी त्यांच्या मोबाइल वापराची गोष्ट सांगितली. सुरुवातीला छोटा मोबाइल वापर करत होत्या. त्यामध्ये मेमरी कार्ड टाकून गाणी ऐकायचो असं त्यांनी सांगितलं. मोठे मोबाइल घेतल्यानंतर तो शिकायला एक वर्ष लागल्याचं मनीषा हजारे म्हणाले. इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटचा वापर सुरु केल्याचं त्या म्हणाल्या. सुरुवातीला इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला पण प्रतिसाद मिळत नव्हता, असं मनीषा हजारे म्हणाल्या. सुरुवातीला व्हिडिओ टाकला मोबाइल स्वीच ऑफ केला होता आणि दिवसभर बघितलंच नव्हतं एका व्हिडिओला दोन हजार लाईक आल्या होत्या, असं मनीषा हजारे म्हणाल्या. सकाळी, दुपारी व्हिडिओ टाकायचा असा दिनक्रम बनला होता. एका दिवशी गावाकडून फोन आला आणि त्यांनी व्हिडिओ व्हायरल झाल्याचं सांगितलं असं मनीषा हजारे यांनी म्हटलं.अशोक हजारे यांनी मनीषा हजारे यांच्यावर कधीचं दबाव आणला नसल्याचं म्हटलं. व्हिडिओ व्हायरल कधी झाला हे कळलंच नव्हतं. गावातून फोन आला आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याचं त्यांनी सांगितलं.मनीषा हजारे आणि अशोक हजारे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला ते नेमके कोण आहेत याचा शोध सुरु झाला. त्यानंतर इन्स्टाग्रामवरील अकाऊंटला अनेकांनी फॉलो केलं. बघता बघता त्यांचे लाखभर फॉलोअर्स देखील झाले. मात्र, त्यांची प्रसिद्धी काही जणांच्या डोळ्यात खुपली. त्यांचं अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळं हजारे दाम्पत्याला मनस्ताप देखील सहन करावा लागला. काही इन्स्टाग्राम वापरणाऱ्या जाणकारांच्या मदतीनं त्यांनी ते अकाऊंट पूर्ववत केलं. आता मनीषा हजारे यांनी त्यांच्या नावाचं अकाऊंट देखील सुरु केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed