• Wed. Apr 30th, 2025

पाकिस्तानला 10-20 टन गहू पाठवा:RSS सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल म्हणाले- भारताने शेजार धर्म पाळावा

Byjantaadmin

Feb 24, 2023

पाकिस्तानच्या आर्थिक संकटावर संघाने सरकारला शेजार धर्माचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल म्हणाले, उपासमारीच्या काळात भारत पाकिस्तानला 10-20 टन गहू पाठवू शकतो. चित्रपट निर्माते इक्बाल दुर्रानी यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ.कृष्ण गोपाल बोलत होते. संघाचे ज्येष्ठ प्रचारक इंद्रेश कुमारही यावेळी उपस्थित होते.

सह सरकार्यवाह डॉ कृष्ण गोपाल यांनी पाकिस्तानातील परिस्थितीवर 3 गोष्टी सांगितल्या…

1. 70 वर्षांपूर्वी आपल्यासोबतच होते
कृष्ण गोपाल म्हणाले, ‘पाकिस्तानमध्ये पीठ 250 रुपये किलो झाले आहे. वाईट वाटते. आपण त्यांना पीठ पाठवू शकतो. भारत त्यांना 25-50 लाख टन गहू देऊ शकतो. ते मागताच नाहीत. 70 वर्षांपूर्वी ते आपल्यासोबतच होते.’

2. पाकिस्तान भांडत राहतो तरीही तो सुखी राहावा अशी आमची इच्छा
ते म्हणाले, ‘पाकिस्तान आपल्याशी भांडत राहतो. भारतासोबत 4 युद्धे झाली आहेत. हल्ला पाकिस्तानच करतो. रात्रंदिवस आपला अपमान करतात, तरीही त्यांनी सुखी राहावे अशी आमची इच्छा आहे.

3. पाकिस्तान मागत नाही, पण आपण गहू पाठवला पाहिजे
सह सरकार्यवाह म्हणाले, ‘दोन्ही देशांमधील एवढ्या दुराव्याचा फायदा काय? त्यांच्या देशात एक कुत्राही उपाशी राहू नये, अशी आमची इच्छा आहे. आपण सर्वे भवन्तु सुखिनः मानणारा देश आहोत. पाकिस्तान आपल्याकडे मागत नाहीये, पण भारताने गहू पाठवावा. भारताच्या भूमीवरील कोणतीही व्यक्ती, मग ती जैन, शीख, वैष्णव, आर्य समाजी असो, ते सर्वे भवंतु सुखिन: शिवाय अपूर्ण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *