• Thu. May 1st, 2025

माजी आमदार देवीसिंह शेखावत यांचे निधन:माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे होते पती

Byjantaadmin

Feb 24, 2023

माजी आमदार देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात खासगी रुग्णालयात शुकवारी सकाळी निधन झाले. पुण्यातील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे ते पती होत.

शुक्रवारी सकाळी देवीसिंह शेखावत यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ते अमरावतीचे पहिले महापौर होते.

दोन दिवसांपूर्वी देवीसिंह शेखावत यांना अचानक हृदयविकाराचा धक्का आल्याने पुण्याच्या केईएम रुग्णालयात दाखल केले होते. आज सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. देवीसिंह शेखावत आणि प्रतिभा पाटील यांचा विवाह 7 जुलै 1965 रोजी झाला होता.

देवीसिंह शेखावत शिक्षण क्षेत्रातही खूप सक्रिय होते. 1972 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएचडी केली. विद्या भारती शिक्षण संस्था फाऊंडेशन संचालित महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. देवीसिंह शेखावत 1985 मध्ये अमरावतीमधून आमदार म्हणून निवडून आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *