• Thu. Aug 7th, 2025

धक्कादायक! कॉपी मुक्त अभियानाच्या नावाखाली चक्क मुलींचे …

Byjantaadmin

Feb 23, 2023

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाल्या आहेत (HSC Board Exams ). परिक्षेच्या पहिल्याच  दिवशी मोठा घोळ झाला (HSC Board Exams) होता. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्ना ऐवजी उत्तर छापून आले ( Error in English Subject Question Paper). तर, दुसरीकडे जालना येथे कॉपीमुक्त अभियानाचा धसका घेवून विद्यार्थी परीक्षेलाच आले नाहीत. फोन करून बोलावले तरीही हे विद्यार्थी परीक्षेला आले नाहीत. तर,  भंडारा येथे अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. कॉपी मुक्त अभियानाच्या नावाखाली चक्क मुलींचे अंडरगार्मेट्स तपासले यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथिल नानाजी जोशी जुनिअर कॉलेज येथे बारावीची परीक्षा केंद्र आहे. याच नानाजी जोशी महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेसाठी आलेल्या मुलींची तपासणी ही चुकीच्या पद्धतीने केली असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी लावला आहे.

नेमका काय आहे प्रकार?

भंडारा शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शहापूर येथे नानाजी जोशी जुनिअर कॉलेज या ठिकाणी बारावी परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावर डिफेन्स सर्विस ज्युनिअर कॉलेज व नानाजी जोशी ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मात्र, डिफेन्स सर्विस जुनिअर कॉलेज शहापूर येथील विद्यार्थ्यांची तपासणी ही चुकीच्या पद्धतीने केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमचे अंडर गार्मेंट्स तपासले गेले असा आरोप या मुलींना एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना केला आहे. विद्यार्थिनीच्या सांगण्यावरून डिफेन्स सर्विस ज्युनिअर कॉलेज येथील प्रिन्सिपल यांनी तशी तक्रार शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. पण मुलींना परीक्षेच्या वेळेला मानसिक त्रास होऊ नये म्हणून मुलींनी कॅमेरा समोर येण्यास नकार दिला आहे.

आरोप प्रत्यारोप

याविषयी नानाजी जोशी जुनिअर कॉलेज येथे जाऊन तेथील प्रिन्सिपल व शिक्षकांची विचारपूस केली असता असं कुठलंही प्रकार या ठिकाणी घडलेले नाही असे सांगण्यात आले आहे. तर, शिक्षण विभागाच्या गाईडलाईन्स नुसार आम्ही मुलींची तपासणी केलेली आहे. आणि मुलींची तपासणी ही महिला शिक्षकांनीच केली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे डिफेन्स सर्विस ज्युनिअर कॉलेज यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आहे असं मतही नानाजी जोशी येथील शिक्षकाने व केंद्र संचालकांनी व्यक्त केले आहे. नानाजी जोशी महाविद्यालयातील प्रकार आता शिक्षणाधिकारी यांच्याकडे गेला मात्र डिफेन्स सर्विस ज्युनिअर कॉलेज येथील प्राचार्य यांनी हा प्रकरण सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे स्वतःच्या शाळेमध्ये बारावीचा सेंटर यावा याकरिता डिफेन्स सर्विस ज्युनिअर कॉलेज यांची खटाटोप तर नाही ना असाही सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. मात्र चौकशी अंतिम नक्की सत्य काय हे समोर येईल. राज्यभरात यंदा 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. यावर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *