• Fri. May 2nd, 2025

निलंगा मतदारसंघातील 40 गावांच्या विकास कामांसाठी 4 कोटी निधीस मंजूरी

Byjantaadmin

Feb 23, 2023

निलंगा मतदारसंघातील 40 गावांच्या विकास कामांसाठी 4 कोटी निधीस मंजूरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आ. निलंगेकरांनी मानले आभार
निलंगा/प्रतिनिधीः- माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सातत्याने मतदारसंघातील विविध विकास कामांकडे लक्ष देऊन त्या कामांसाठी निधी मिळविण्याकरीता केंद्र व राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. यामुळेच मतदारसंघातील विकास कामांना गती प्राप्ती झाली आहे. आता राज्यशासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मतदारसंघातील निलंगा, देवणी व शिरुर अनंतपाळ तालुक्यातील 40 गावातील विविध विकास कामांसाठी 4 कोटीच्या निधीस मंजूरी मिळाली आहे. सदर निधी मंजूर केल्याबद्दल आ. निलंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केलेले असून मतदारसंघातील जनतेने याबद्दल आ. निलंगेकर यांना धन्यवादन दिले आहेत.
महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असताना विकासाचा वेग कांहीसा मंदावलेला होता. त्याचबरेाबर विकास कामांच्या निधीबाबतही असमतोलपणा केल्याने विकास कामे रखडली असल्याचे चित्र निर्माण झालेले होते. मात्र राज्यात सत्ता परिवर्तन झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाला गती देणारे सरकार आले. यानंतर माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मतदारसंघातील विकास कामांना अधिक गती देण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध होण्याकरीता पाठपुरावा सुरु केला. यापुर्वी निलंगा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. या निधी मंजूरीचा वेग असाच कायम राहिला असल्याने आता पुन्हा एकदा निलंगा मतदारसंघातील तिन्ही तालुका अंतर्गत असलेल्या 40 गावांसाठी 4 कोटी रूपयांच्या विकास निधी प्राप्त झालेला आहे.
माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्यशासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर झालेला आहे. या निधीच्या माध्यमातून निलंगा तालुक्यातील 22, देवणी व शिरुर अनंतपाळ तालुक्यातील प्रत्येकी 9 गावांसाठी हा निधी विकास कामांकरीता खर्च होणार आहे. या निधीच्या माध्यमातून विविध रस्त्याचे काँक्रटीकरण, पथदिवे, समाजमंदीर, बुद्ध विहार, स्मशानभुमी आणि सुशोभिकरणाची कामे होणार आहेत. सदर निधी मंजूर करून विकासाचा वेग कायम ठेवल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत. तसेच सदर निधीच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल मतदारसंघातील जनतेने माजी मंत्री आ. निलंगेकर यांना धन्यवाद दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *