महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा, जि. लातूर येथे आज दि.20 फेब्रुवारी,२०२३ पासून राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचऱ्यांच्या रास्त मागण्याच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला. प्रमुख मागण्यात, शासनाच्या सेवांतर्गतत आश्वासित प्रगती योजना, सातवा वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10, 20, 30 वर्षानंतरच्या लाभाची योजना लागू करणे, 1410 शिक्षकेत्तर कर्मचऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, आजपर्यंतचा फरक देणे, 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे, याबाबतच्या शासन विरोधी धोरणाच्या विरोधात महासंघाच्या आदेशानुसार महाविद्यालयाचे सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात महाविद्यालयीन कामकाज बंद करून उपस्थित झाले. या प्रसंगी महाविद्यालयाचे श्री नखाते एस. बी., श्री माने दत्तात्रय जी., माने एस. एस. पाटील पवन, जाधव ए. व्ही., देशमुख व्ही. जे., संतोष तोरसल्ले, नामदेव गाडीवान, सोनकांबळे सुरेश, शिंदे महादू, सूरवसे. एस पी., वाकळे जी. व्ही. खांडेकर डी. एम. तोरकड यु. टी., भागवत पवार, शेख आतिक इतर कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये प्राध्यापकांनीही पाठींबा देऊन सहभाग नोंदविला.. बंद करून उपस्थित झाले