मनमानी व भ्रष्ट नगरपंचायतीच्या कारभाराविरोधात मुख्याधिकारी यांना धरले धारेवर
शिरुर अनंतपाळ नगरपंचायत हद्दीतील महाविकास आघाडीचे 08 नगरसेवक असलेल्या प्रभागात विवीध कामा संर्दभात पहिल्या सर्वसाधारण बैठकीत सर्वानुमते ठराव पारीत होऊनही पाणीपुरवठा, स्वछतेसंर्दभात, विठ्ठल रुक्मीणी मंदिरासमोरील, बाजुचा नालीवरील पडलेला छत दुरस्ती करण्यासंर्दभात व ईतर केलेली मागणी प्रशासनाकडुन, सत्ताधारी यांच्याकडुन महाविकास आघाडी नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी,गलथण,भ्रष्ठ कारभाराविरोधात मा. मुख्याधिकारी यांना वेळोवेळी लेखी, तोंडी, विनंती करुनही मुख्याधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असलेबाबत नगरपंचायतीवर महाविकास आघाडी नगरसेवकांनी वार्डावार्डातील महिलांना,पुरुषांना सोबत घेऊन घागर र्मोचा काढुन मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांना वार्डातील महिलांनी व नगरसेवकांनी चांगलेच धारेवर धरले…
शेवटी मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी महाविकास आघाडीचे निवेदन स्वीकारुन,चर्चा करुन आघाडीचे गटनेते यांना लेखी निवेदन देऊन गटनेते यांनी दिलेल्या निवेदनातील सर्वच कामे करण्यासाठी लेखी निवेदन मुख्याधिकारी यांनी गटनेते यांना दिलेल्या लेखी मागण्या पुर्ण करण्यासाठी कालावधी मागितल्यामुळे मुख्याधिकारीकडुन लेखी निवेदन स्वीकारुन र्मोचा स्थगीत करण्यात आला..
यावेळी महाविकास आघाडी गटनेते अनंत काळे, नगरसेवक. सुधीर लखनगावे,संतोष शिवणे,नगरसेविका.रागिणी शिवणे,कुसुम खरटमोल,श्रीदेवी संभाळे,राजनंदिनी तांदळे, पार्वतीबाई देवंगरे,शिवसेना शहरप्रमुख. सतिश शिवणे, राष्ट्रवादी शहराअध्यक्ष. अनिल देवंगरे, ऋषीकेश आवाळे, महेश भिमाले,संभाजी हत्तरगे,रोहीत आवाळे,माधव खरटमोल,माधव संभाळे,रोहीत तांदळे,सोमनाथ भोसले,सिध्दांत गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, वार्डातील शेकडो नागरिक र्मोचात सहभागी होते.