अमित शाह हे सहकार क्षेत्रातील नेतृत्व आहे. त्यांनी सहकारी संस्थापासून थेट राज्य सहकारी बॅंकांपर्यंत सहाकार क्षेत्रात काम केले आहे. जिल्हा सहकारी बँका संभाळल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सहकार क्षेत्राशी जवळचे नाते आहे.”
”ज्या वेळेस आम्ही महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अडचणी घेऊन त्यांच्याकडे जात होतो. त्यावेळी तातडीने त्यावर उपाययोजना करण्याचे काम त्यांनी केले. कारखान्यांसाठी इनकम टॅक्सचा जो मुद्दा होता तो वर्षानुवर्षे अडचणीचा ठरत होता. मात्र, तो देखील त्यांनी मार्गी लावला आहे”, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
सकाळ माध्यम समूहाच्यावतीने बँकींग व साखर उद्योगासाठी सहकार महापरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांचे आभार मानत त्यांचे तोंडभरून कौतुक केले.
या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री AMIT SHAH, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, मुख्यमंत्रीEKNATH SHINDE उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,BJP नेते प्रवीण दरेकर, सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संपादक, संचालक श्रीराम पवार उपस्थित होते.