• Fri. Aug 8th, 2025

ट्रॅव्हल बसचा टायर फुटला आणि… समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

Byjantaadmin

Feb 19, 2023

वाशिम : शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर (shirdi nagpur samruddhi mahamarg) अपघातांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर वाशिमजवळ भीषण अपघात झाला आहे (Strange accident near Washim on Samriddhi Highway). एका खाजगी ट्रॅव्हल बसचा टायर फुटून झालेल्या या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले आहेत.

समृद्धी महामार्गावरील (samruddhi mahamarg) वाशिम जिल्ह्यातील दोनद नजीक हा अपघाता झाला. नागपूरवरून मुंबई ला जाणाऱ्या मेहरा ट्रॅव्हल्सची बस अपघातग्रस्त झाली आहे. भरधाव वेगात असलेल्या या बसचा मागील टायर फुटला. यामुळ बस पलटी होऊन अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या अपघातात बसमधील 30 पैकी 14 प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ जखमींना बाहेर काढण्यात आले. यापैकी चार प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.अपघातामधील जखमींना कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, गंभीर जखमी प्रवाशांना अकोला येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्ग (shirdi nagpur samruddhi mahamarg) प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत आहे. या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी हे अंतर केवळ 5 तासांच पार करता येत आहे. 11 डिसेंबर 2022 पासून हा मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. दररोज हजारो प्रवासी या मार्गावरुन प्रवास करत आहे. साई भक्तांसाठी या मार्गावर एसटी महामंडळातर्फे विशेष बस सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. या बस सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

समृद्धी महामार्गावर स्टंटबाजी

समृद्धी महामार्गावर दुचाकी तसेच तीन चाकी रिक्षा यांना परवानगी नाही. यामुळे पादचाऱ्यांना देखील येथे जाण्या, मनाई आहे. त्यातच  समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा इंटरचेंज जवळ काही तरुणांनी स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल  झाला होता.  चार-पाच टवाळखोर समृद्धी महामार्गावरच्या मधल्या लेनपर्यंत जात स्टंटबाजी करत फोटोशूट केल्याचा  हा व्हिडिओ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *