उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणार निकाल काल निवडणूक आयोगाने दिला. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांच्या गटाला देण्याचा तो निर्णय होता. (Shivsena) या निर्णयाचे राजकीय पडसाद राज्यात उमटत आहेत. ठिकठिकाणी शिंदे- ठाकरे गट समोरासमोर येत आहेत. अनेक राजकीय पक्षांनी या निर्णयाबद्दल नाराजीही व्यक्त केली.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव pankaja mundeयांनी मात्र या विषयावर अत्यंत्य मोजक्या शब्दात सावध प्रतिक्रिया दिली. महावशिवरात्री निमित्त सकाळी परळी वैद्यनाथांचे दर्शन घेतल्यानंतर त्या बोलत होत्या. udhav thakare राजकीय प्रतिक्रिया देणार नाही, असे स्पष्ट करत फक्त एवढंच सांगेल, ज्यांना चिन्ह, नाव मिळालं त्यांना आणि ज्यांना नाही मिळालं त्यांना या दोघांनाही या निर्णयला पुढे नेण्याची ईश्वर शक्ती देवो, असे पंकजा म्हणाल्या.
पकंजा मुंडे आणि उद्धव ठाकरे यांचे कौटुंबिक संबंध आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून असलेले हे संबंध पुढे पंकजा, प्रितम मुंडे यांनी देखील जपले. जेव्हा जेव्हा भाजपमध्ये पंकजा यांना त्रास झाला, खच्चीकरणाचे प्रयत्न झाले, तेव्हा तेव्हा त्यांना शिवसेनेकडून दिलासा देण्याचा प्रयत्न झाला.
परळी मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्यांना राज्यसभा, विधान परिषदेवर संधी नाकारत पक्ष कार्याच्या नावाखाली राष्ट्रीय स्तरावरची जबाबदारी सोपवण्यात आली. अनेकदा पंकजा मुंडे यांनी आता निर्णय घ्यावा, अशी हाक त्यांच्या समर्थकांकडून वेळोवेळी दिली गेली.
त्यांनी शिवसेनेत जावे, असा देखील एक मतप्रवाह होता असे बोलले जाते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यामुळे त्या काय बोलतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु त्यांनी मोजक्या शब्दात शिंदे आणि ठाकरे दोघांनाही ईश्वराने शक्ती देवो, असे म्हणत अधिक भाष्य करणे टाळले.