• Fri. Aug 8th, 2025

९० किलो तांदूळ आणि रंगांच्या विविध छटा वापरून साकारण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी

Byjantaadmin

Feb 19, 2023
९० किलो तांदूळ आणि रंगांच्या विविध छटा वापरून साकारण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी

४२५ चौरस फुटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी

सांगली : पलूस तालुक्यातील अभिजीत कदम प्रशाला अमरापूर येथे तब्बल ९० किलो तांदळाचा वापर करीत ॲक्रालिक रंगाच्या विविध छटा वापरुन ४२५ चौरस फुटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी साकारण्यात आली.  शाळेतील कला शिक्षक व सातवी मधील १२ विद्यार्थीनीना भव्य रांगोळी साकारण्यासाठी दोन दिवस १९ तासाचा अवधी लागला.

नरेश लोहार ( मुळगाव विसापूर, ता. खटाव) या गावातील कला शिक्षकांनी विद्यार्थिनींच्या मदतीने भव्य रांगोळी साकारली. लोहार यांनी अमरापूर विद्यालयात सहा डिसेंबर २२ रोजी साडेतीन हजार चौरस फूट आकाराची ३२२१ वहया पुस्तकांमधून डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकरुपी पहिली प्रतिकृती साकारली होती.

महाराजांची ही भव्य रांगोळी साकारताना लोहार यांना विद्यार्थिनी प्रियांका बडे ,आर्या शिंदे, करिष्मा मुलाणी, तनुष्का शिंदे, श्रावणी मोरे, संस्कृती यादव, श्रावणी पोळ , शौर्य कणसे संचिता रुपनर, सिद्धी पवार, वैष्णवी खरात, सिद्धी तुपे यांचे सहकार्य लाभले.

इयता सातवीच्या विद्यार्थीनीनी एक आगळा वेगळा उपक्रम केला आहे आहे ही उल्लेखनीय असून कौतुकास्पद बाब आहे असे मत मुख्याध्यापक डी. एम. मोरे यांनी केले अभिजीत कदम प्रशाला अमरापूर (ता कडेगाव)येथे छत्रपती शिवाजी महाराजाची भव्य रांगोळी सर्वसामान्यांना व पालकाना पहाता यावी यासाठी दोन दिवस खुली ठेवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *