शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धा 2022-23 मोहम्मददारा मुख्तार शेख सिल्वर मेडल
लातूर,:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि महाराष्ट्र कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धा दिनांक 13 व 14 फेब्रुवारी 2023 रोजी बारामती येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये 82 किलो वरील गटामध्ये मोहम्मद दारा मुख्तार शेख ने सिल्वर मेडल प्राप्त केले. मोहम्मददाराला कराटे प्रशिक्षक श्री तुषार अवस्थी यांचे मार्गदर्शन लाभले.