निलंगा:-महाराष्ट्र महविद्यालय निलंगा येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांने आज दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी काळ्याफिती लावून कार्यालयीन कामकाज करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती. राज्यातील अकृषी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयाच्या महासंघाची संयुक्त कृती समिती.
दिनांक 2 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झालेल्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार आंदोलनाचा आज तिसरा टप्पा आज दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी काळ्या फिती लावून कार्यालयीन कामकाज चालू ठेवले व शासनाचा जाहीर निषेध नोंदविला आंदोलनातील आज तिसरा टप्पा असून उद्या दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप व दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पासून सर्व कृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्याये बेमुदत बंद राहतील. शासनाने वेळीच यावर तोडगा काढावा नाहीतर बारावी परीक्षा वर होणारा परिणामास तयार राहावे. या प्रसंगी महाविद्यालयाचे श्री माने दत्तात्रय जी., माने एस. एस. जाधव या ए. व्ही. लोंढे आर.बी., देशमुख व्ही. जे. संतोष तोरसल्ले, नामदेव गाडीवान, सोनकांबळे सुरेश, शिंदे महादू, वाकळे जी. व्ही. खांडेकर डी. एम. इतर कर्मचारी उपस्थित होते
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून कार्यालयीन कामकाज
