दिल्लीतील मेहरौली येथील श्रद्धा वालकर हत्याकांडासारखेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. 10 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील बाबा हरिदास नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणाने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली होती. यानंतर मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवला. दरम्यान, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वीच कोणीतरी पोलिसांना कळवले. अखेर पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे. निक्की यादव (22) असे हत्या झालेल्या युवतीची नाव आहे. तर साहिल गेहलोत असे हत्या करणाऱ्या तिच्या मित्राचे नाव आहे.

दुसर्याशी लग्न करण्याच्या मुद्द्यावरून वाद
क्राइम ब्रँचचे डीसीपी सतीश कुमार यांनी सांगितले की, मृत निक्की यादव (22) ही हरियाणातील झज्जर येथील मुळ राहणारी होती. ती 2018 पासून पश्चिम दिल्लीतील उत्तम नगर भागात साहिल गेहलोत (24) याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. साहिलचे लग्न घरच्यांनी दुसरीकडे लावले होते. निक्की आणि साहिलमध्ये 9 फेब्रुवारीला या मुद्द्यावरून कडाक्याचे भांडण झाले.
10 फेब्रुवारी रोजी साहिलने ISBT जवळ कारमध्ये मोबाईल चार्जच्या केबलने निक्कीचा गळा आवळून तिचा खून केला. यानंतर तो मृतदेह गाडीत घेऊन फिरत राहिला, त्यानंतर मित्रांव गावाच्या हद्दीतील एका ढाब्याच्या फ्रीजमध्ये तिचा मृतदेह लपवून ठेवला. ढाब्यावर मृतदेह लपवून ठेवल्याची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. साहिलने 10 फेब्रुवारीलाच दुसऱ्या मुलीशी लग्न केले होते.
श्रद्धा वालकरची अशीच हत्या झाली होती
गेल्यावर्षी 18 मे 2022 रोजी दिल्लीतील मैहरौली येथे श्रद्धा वालकरची तिच्या लिव्ह इन पार्टनरमध्ये राहणाऱ्या आफताबने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करण्यात आले होते. हे तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. आफताबला पोलिसांनी अटक केली असून तो सद्या तिहार जेलमध्ये आहे.