मी नाराज असल्याचे मला मीडियामुळे समजले. मी नाराज नव्हतोच, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. तर शरद पवारांना विचारून जर पहाटेचा शपथविधी झाला असता, तर सरकार कोसळले नसते, असे म्हणत पहाटेच्या शपथविधीवर देखील आपली प्रतिक्रिया दिली.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, भीमाशंकरचा वाद होण्याचा काही कारण नाही. ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. महाराष्ट्रातून काय, काय पळवून न्यायचे याचा विचार सुरू असून, ज्यांनी याला विरोध करायला हवे ते शांत आहे. आसाममध्ये नवीनच काय मांडणी झाली आहे. भीमशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्राचे वैभव आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तर पुराणामध्ये या सर्वांची नाेंद आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान शरद पवारांना विचारून पहाटेचा शपथविधी झाला असता, तर सरकार कोसळले नसते. शरद पवार यांच्या सहमतीने हे झाले नाही असे माझे मत आहे. भाजपकडून केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना मुख्य मुद्द्यांना हात घालायचा नसतो म्हणून ते जनतेची अशी दिशाभूल करतात असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
मला मीडियातून कळाले
पत्रकारांनी तुम्ही नाराज असल्याचा प्रश्न केला असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, माझ्या नाराजीच्या चर्चा या मला मीडियाच्या मार्फत कळत असल्याचा सांगतानाच मी नाराज नव्हतोच, प्रत्येक संघटनेत पत्र व्यवहार सुरू असतो. तसा आम्ही केल्याचे सांगतानाच त्यांना भाजपवर आरोप केला आहे.
एच. के. पाटील म्हणाले?
काँग्रेस एक परिवार असून बाळासाहेब थोरात यांचे सर्व गैरसमज मी दूर केले आहेत, असे काँग्रेस प्रभारी नेते एच. के. पाटील यांनी रविवारी सांगितले.काँग्रेसच्या रायपूरमध्ये होणाऱ्या अधिवेशनात बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
बाळासाहेब थोरात यांची संपूर्ण बाजू आज मी ऐकून घेतली. मात्र, काँग्रेस एक परिवार आहे. हा विषय परिवारातील अंतर्गत असल्याचे सांगतानाच सत्यजित तांबेंवर काही चर्चा झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. थोरातांचे काही गैरसमज झाले आहेत, ते लवकरच दूर करू. लहान, मोठ्या समस्या येतच असतात.