विलास सहकारी साखर कारखान्याची दिमाखात घोडदौड
सर्वांच्या परिश्रमाने सभासद, शेतकरी यांच्यासाठी उत्कृष्ट काम
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
४ लाख २१ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन
लातूर प्रतिनिधी: विलास सहकारी साखर कारखान्याण्यामध्ये सभासद,ऊसउत्पादक शेतकरी यांच्यासह सर्व घटकासाठी उत्कृष्ट काम सुरू आहे. यामूळे येथील सर्वांच्या परिश्रमाने कारखान्याची घोडदौड दिमाखात सूरू आहे, असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार तथा कारखान्याचे संस्थापक चेअरमन अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे. विलास सहकारी साखर कारखाना, वैशालीनगर, निवळीच्या गळीत हंगाम सन २०२२-२३ मधील ४ लाख २१ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार तथा कारखान्याचे संस्थापक चेअरमन अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते सर्व संचालकांच्या उपस्थितीत मंगळवार दि. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमास लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को. ऑपरेटीव्ह बॅकेचे व्हा. चेअरमन समद पटेल, टवेन्टिवन शुगर्स ली.चे व्हा. चेअरमन विजय देशमुख, व्हा. चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक एस.आर.देसाई व संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अमर मोरे, अनिल पाटील, रंजित पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, भारत आदमाने, रामदास राऊत, सुभाष माने, संजय पाटील खंडापूरकर, ज्ञानोबा पडीले आदी उपस्थित होते. सुरू असलेल्या गळीत हंगाम सन २०२२-२३ मध्ये आज अखेर हंगामातील ९७ गाळप दिवसात ४,०५,६८० मे. टन ऊसाचे गाळप होवून ४,२१,१११ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर ऊतारा १०.३० टक्के एवढा मिळाला आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार तथा कारखान्याचे संस्थापक चेअरमन अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते व सर्व संचालकांच्या उपस्थितीत ४ लाख २१ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलतांना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, विलास सहकारी साखर कारखान्याण्यामध्ये सभासद, शेतकरी यांच्यासाठी उत्कृष्ट काम सुरू आहे. यामूळे कारखान्याची घोडदौड दिमाखात सूरू आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने पुरस्काराने विलास सहकारी साखर कारखाना युनीट १ व युनीट २ ला सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल सर्वांचे कौतूक करून अभिनंदन केले. आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या नावाने हा कारखाना सुरू आहे. या कामाची दखल राज्यात नाही तर देशपातळीवर घेतली जात आहे. या गळीत हंगाम उत्पादील झालेली साखरेचे पूजन कारखाना स्थळावर आज प्रसन्न वातावरणात पडत आहे, याचा आनंद असल्याचे सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, हंगामात कमी कालावधीत जास्तीत जास्त गाळप करण्याचे नियोजन करण्यासाठी संचालक, प्रशासन आणि शेतकी विभागाने तत्पर रहावे, अशा सूचना यावेळी केल्या. आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांची प्रेरणा घेऊन कारखाना वाटचाल करीत आहे. तर माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांचे यांचे मार्गदर्शनातून विलास सहकारी साखर कारखाना यशस्वी वाटचाल करीत आहे. या हंगामात अधिकारी, कर्मचारी, कामगार सर्वांनी मेहनत घेऊन हंगाम यशस्वी केला यांचे करून सर्वांचे यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी अभिनंदन केले. या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील सभासदाच्या उसाचे प्राधान्याने गाळप होत असून गळीत हंगामात तांत्रीक कारणाने कारखाना बंद राहणार नाही, यासाठीपूरेपूर दक्षता घेण्यात येत आहे. गाळप झालेल्या सभासद आणि उसउत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला पहिला हप्ता प्रति टन २,२०० रूपये प्रमाणे १० दिवसाला उसबील अदा केले जात आहे. या गळीत हंगामात ४,०५,६८० मे. टन ऊसाचे गाळप होवून ४,२१,१११ क्विंटल साखरेचे उत्पादन केले या बददल माजी मंत्री तथा कारखान्याचे संस्थापक चेअरमन अमित विलासराव देशमुख यांनी व्हा.चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक मंडळ, सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कामगार, ऊसतोडणी व ऊस वाहतुक ठेकेदार यांचे अभिनंदन केले