राज्याचे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांची माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी घेतली सदिच्छा भेट
उस्मानाबाद (प्रतिनिधी)राज्याचे माजी मंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्या उस्मानाबाद येथील निवासस्थानी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी सोमवारी सदिच्छा भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली तसेच विविध विषयवार जुन्या आठवणींना उजाळा देत दिलखुलासपणे चर्चा केली यावेळी राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील सेलुकर,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक अँड श्रीपतराव काकडे, संत मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्याम भोसले,जिल्हा काँग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ उपस्थित होते