• Sat. May 10th, 2025

शिवाजीराव पाटील विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

Byjantaadmin

Feb 15, 2023

शिवाजीराव पाटील विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

माजी सभापती अजित माने यांची प्रमुख उपस्थिती

निलंगा(प्रतिनिधी):-निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर विद्यालयातील पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून हिंदि व मराठी गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.भारतीय संस्कृती,आदिवासी गीते,कोळी गीत,मराठमोळ्या वेशात अनेक चिञपटातील गीतावर नृत्य सादर केली.संस्थेचे अध्यक्ष टी.टी.माने यानी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यावेळी संस्थेचे सचिव तथा निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, उपसरपंच संभाजी उसनाळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष राम उसनाळे, मुख्याध्यापक दत्ता शाहीर, ओम गिरी, काटे जवळग्याचे सरपंच शरद सोमवंशी, अनुसया माने, अनुसया सुर्यवंशी तंटामुक्तीचे अध्यक्ष निवांत उसनाळे अदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या स्नेह संमेलनात श्रुती माने, धनश्री धुमाळ, मोहिनी पाटील, श्वेता भावे, मेघा शिंदे, संकेत सूर्यवंशी, यश सूर्यवंशी, शिवाजी भालके, आकाश धुमाळ, प्रीती रांजणे आदी विद्यार्थ्यांनी मोरया रे बाप्पा मोरया रे, तेरी मिट्टी मे मिल जावा, तानाजी मालुसरे नाटिका, चंद्रा लावणी, मला वेड लावलय, बम बोले….
इत्यादी कलाविष्कार सादर केले. बंडी धनगर समाजाच्या लहान लहान मुलांनी सुद्धा खूप चांगला नृत्यप्रकार स्कूल चले हम सादर केला . विशेष म्हणजे शिक्षणापासून हा वंचित असलेला समाज स्टेजवर येण्याची ही पहिलीच वेळ होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एस.” पेठकर, तर आभार व्ही.के.रेड्डी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्ही.एस.माने, एम एस पेटकर,बी.व्हि.माकणे, डी.ए. जाधव, प्रताप घोटाळे, श्रीमती हेमा सगर, संभाजी चांदोरे,एस.आर.पाटील,एन.जी.सुतार अदीसह शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *