• Wed. May 7th, 2025

लातुर जिल्ह्यात 9 लाख 91 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त:गुन्हा दाखल

Byjantaadmin

Feb 12, 2023

लातुर जिल्ह्यात 9 लाख 91 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त:गुन्हा दाखल

अहमदपूर:-लातूरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यामध्ये 9 लाख 91 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चारजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपविभाग अहमदपूर हद्दीमधील अवैध धंद्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली की, अहमदपूर शहर व परिसरातील काही व्यक्ती प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखुची चोरटी विक्री व्यवसाय करीत आहेत, साठवणूक करीत आहेत. त्यावरुन या माहितीची शहनिशा करून सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदाराच्या पथकाने छापा मारून 4 इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे, महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटखा व सुगंधित पानमसाला असा एकूण 9 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सहाय्यक आयुक्त कार्यालय लातूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे अहमदपूर येथे प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारे विठ्ठल गुरुलिंग हामणे (46) रा. भाग्यनगर अहमदपूर, बबन बाबू
हामने रा. अहमदपूर, शंकर कानगुले रा. अहमदपूर यांच्याविरुध्द पोलीस ठाणे अहमदपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रोकडे, पोलीस अमलदार कलमे, पुठेवाड, बाळासाहेब साळवे, बापूराव धुळगुंडे, सुदर्शन घुगे, आरदवाड, रतनदीप कांबळे यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *