समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Mahamarg) नागपूर – मुंबई या (Mumbai Nagpur Expressway) शहरामधील अंतर कमी झाल्यानंतर आता दिल्ली मुंबईचं (Delhi-Mumbai Expressway) अंतर कमी झालं आहे. देशातली सर्वात लांब महामार्ग असलेल्या दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा तयार झाला आहे. या महामार्गामुळे मुंबई (Mumbai) ते दिल्लीमधील (Delhi) अंतर गाठायला आता फक्त 12 तास लागणार आहेत. तर दिल्ली ते जयपूर 5 तासांमध्ये पोहोचता येणार आहे. याचा अर्थ दिल्ली ते जयपूर प्रवास 3.5 तासांने कमी झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) या महामार्गाचं उद्घाटन करणार आहेत. त्यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या महामार्गाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. या महामार्गाची पहिली झलक त्यांनी देशवासीयांना दिली आहे.