राजमाता जिजामाता शैक्षणिक
संकुलात स्वयंशासनदिन उत्साहात
लातूर : येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात शुक्रवारी स्वयंशासनदिन मोठ्या उत्साहात पार पडला. प्रारंभी संकुलाचे प्रमुख प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी स्वयंशासनदिनानिमित्त विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, संस्थेच्या विधी सल्लागार राणी केंद्रे, प्रा. वैशाली केंद्रे, प्रा. अश्विनी केंद्रे, प्रा. कविता केंद्रे, मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे, प्राचार्य गणपत मुंडे, प्रा. आर. व्ही. जायेभाये, प्रा. मदन धुमाळ, राजीव मुंढे, सुधाकर लोहकरे, शोभा कांबळे, सुनीता जवळे, शिवकांत वाडीकर, परमेश्वर गित्ते आदी उपस्थित होते.
या प्रसंगी मुख्याध्यापक म्हणून प्रशांत गित्ते, पर्यवेक्षक प्रणव गरड, लिपिक शुभम यादव तर सेवक म्हणून सुमित मस्के, सम्यक गायकवाड व संकेत झोरे यांनी दिवसभर उत्कृष्टरित्या कारभार सांभाळला. यावेळी शिक्षक म्हणून पूनम कोलते, महानंदा देवकर, श्वेता मलवाडे, आस्मा सय्यद, प्रथमेश तोरे, संचिता मोरे, मानसी डोणे, आश्लेषा राठोड, श्रीकांत साळुंके, पूजा सुरवसे, प्रतिक्षा गवळी, किरण काकडे, कृष्णा तेलंगे, सानिका बहिर, अर्चना बायस, मथुरा स्वामी, गौरी पैठणकर, अर्जुन शिंदे, स्नेहा मस्के, श्रीकृष्ण राजहंस, अंजली भांगे, शर्वरी देशमुख, अस्मिता ठोंबरे, सानिया पठाण, प्राची गायकवाड, आकांक्षा कांबळे, गौरी जोगदंड, संग्राम देशमुख, विराज गायकवाड, स्नेहल शिराळ, संजय म्हेत्रे, अश्विनी गिरी, आदिती सवई, साक्षी गायकवाड आदींनी उत्तमरित्या कामगिरी बजावली.