• Sat. May 3rd, 2025

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षानी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने घेतली पदाधिकाऱ्या सोबत आढावा बैठक

Byjantaadmin

Feb 11, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षानी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने घेतली पदाधिकाऱ्या सोबत आढावा बैठक…

निलंगा :-राज्याचे प्रेणेते तथा लातुर जिल्ह्याचे भाग्यविधाते कर्मयोगी माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर स्मारक अनावरण सोहळा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील निलंगा येथे उपस्थित होते.याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.जि.प. अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांच्या सोबत निलंगा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या सोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली..
यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, माजी राज्य मंत्री.आ.संजय बनसोडे,आ. विक्रम काळे,युवक कार्याअध्यक्ष सूरज चव्हाण,लातूर युवक जिल्हाअध्यक्ष भरत सूर्यवंशी,शहर कार्याअध्यक्ष प्रशांत पाटील,माजी नगरसेवक लातूर नवनाथ आल्टे,आदी उपस्थित होते.यावेळी तालुक्यातील शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच, व पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेल्या सर्वच सदस्यांचा वतीने नेत्यांचा सत्कार करण्यात आला..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबुत करण्यासाठी संघटन करणे अतिशय गरजेचे असल्याचे यावेळी जयंतराव पाटलांनी आढावा बैठकीत उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवर्जून सांगितले. पक्षाचे विचार,कार्य जनतेपर्यंत आपल्या कामाच्या माध्यमातून दाखवून द्यावे लागेल आणि जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पक्षाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करावा लागेल तरच पक्ष संघटन मजबूत होईल आणि कार्यकर्त्यांना निवडणुका समोर जाण्यास शक्ती मिळेल. जनतेच्या मनात अधिराज्य गाजवायचा असेल तर मीच उमेदवार हे सवतःला समजून आजपासूनच डोअर टू डोअर काम करावे अशी सूचना आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला..
या आढावा बैठकीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच ,उपसरपंच, व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निलंगा राष्ट्रवादी काँग्रेसचे ता.अध्यक्ष दिलीप पाटील, शहराध्यक्ष इस्माईल लदाफ, विधानसभा अध्यक्ष सुधीर मसलगे,सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी नगरसेवक हसनभाई चाऊस युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष महादेवी पाटील,अॅड उपसरपंच मंगलताई पाटील,महिला शहराध्यक्ष मुन्नाबी शेख, कार्याअध्यक्ष महेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष अंगद जाधव, विधानसभा कार्याध्यक्ष संदीप मोरे इफरोज शेख,मुस्ताक बागवान, औराद शहराध्यक्ष सिद्दीक मुल्ला,ओम शिंदे,सुग्रीव सूर्यवंशी, महेश चव्हाण,रोहित पाटील, उद्धव मेकाले,राजेश माने,राजू मोरे,सचिन कडतने,सलीम पठाण,मसलगा हरिदास सोळुंखे व सदस्य, जिल्हा सरचिटणीस कोमल देशपांडे,ता. उपाध्यक्ष संगीता कदम,लिंबाजी बिराजदार, स्वरूप धुमाळ, गुणवंतराव जाधव, संजय सावकार, प्रकाश धुमाळ, सचिन दोडके,पांडुरंग पाटील,सरपंच अशोक सूर्यवंशी, हंसराज पाटील,माधवराव भोसले, आजम शेख,शिरूर अनंतपाळ शहराध्यक्ष अनिल देवांग्रे,माधवराव आवळे,नगरसेवक बाबू शिवणे,नगरसेवक विश्वनाथ संभाळे,हकीम बोडिवाले,पत्रकार महताब शेख,देवणी येथून नगरसेवक अमर बोरे, युवक उपाध्यक्ष महेशराव जाधव, हसन मोमीन, वैभव मेहत्रे, अण्णाराव बिराजदार,जहांगीर शेख,कुशाबा कांबळे, बालाजी लव्हे आदी यावेळी उपस्थित होते.सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांना पुढील कार्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ.संजय बनसोडे,आ.विक्रम काळे यांनी शुभेच्छा दिल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *