• Sat. May 3rd, 2025

LIC च्या पॉलिसीधारकांनो… अदाणी समूहातील गुंतवणुकीबाबत LIC च्या प्रमुखांचं मोठं विधान

Byjantaadmin

Feb 11, 2023
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. “जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी”, अशी टॅगलाईन असलेल्या एलआयसी विमा कंपनीवर कोट्यवधी भारतीयांचा विश्वास आहे. त्यामळेच आपल्या कष्टाची कमाई लोक एलयासीमधील पॉलिसीमध्ये गुंतवत असतात. पण हा लोकांचा पैसा एलआयसीने अदाणी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवला. ज्यावरुन गेल्या काही दिवसांत विरोधकांनी बरीच टीका केली. काँग्रेसने तर देशभरात एलयआयसीच्या कार्यालयासमोर आंदोलन देखील केले. आता अदाणी समूहातील गुंतवणूकीबद्दल भारतीय जीवन बिमा निगम अर्थात एलआयसीकडून मोठे विधान समोर आले आहे. एलआयसीचे चेअरमन एम. आर. कुमार यानी बिझनेस टुडेशी बोलताना सांगितले की, “एलआयसीच्या पॉलिसीधारकांनो आणि एलआयसीचे शेअर्स घेतलेल्या लोकांनो घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांनी त्यांच्या गुंतवणुकीबाबत निश्चिंत राहावे.”

२४ जानेवारी रोजी हिंडेनबर्गचा अहवाल सार्वजनिक झाला होता. त्यानंतर अदाणी समूहाला भरमसाठ कर्ज दिल्याबद्दल एलआयसी आणि एसबीआयवर जोरदार टीका होत होती. त्या पार्श्वभूमीवर देशातील कोट्यवधी पॉलिसीधारकांसाठी एलआयसी चेअरमन एम. आर. कुमार विधान महत्त्वाचं आहे. कुमार यांनी सांगितले की, “एलआयसीचे शेअर्स विकत घेतलेल्यांना आणि पॉलिसीधारकांना घाबरम्याचे कोणतेही कारण नाही. त्यांच्यासाठी एक टक्का देखील जोखीम नाही. त्यांच्या गुंतवणुकीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.”

अदाणी समूहात LIC ची गुंतवणूक किती आहे?

LIC ने अदाणी समूहात किती गुंतवणूक केली याचीही माहिती समोर आली आहे. एलआयसीने दिलेल्या माहितीनुसार ही गुंतवणूक एक टक्क्याहून कमी असून एकूण मालमत्तेच्या केवळ ०.९७५ टक्के एवढी आहे. अदाणी समूहात डिसेंबरच्या अखेरीपर्यंत एलआसीची ३५,९१७.३१ कोटी एवढी रक्कम गुंतवण्यात आली होती. तर यापैकी ६ हजार कोटी हे कर्ज दाखविण्यात आलेले आहे.

 

केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांनी ७ फेब्रुवारी रोजी संसदेत बोलताना सांगितले होते की, एलआयसीने अदाणीसमूहासहीत वेगवेगळ्या कंपन्यांमधील इक्विटीमध्ये गुंतवणूक केलेली आहे. मागच्या काही वर्षात ही गुंतवणूक ३०,१२७ कोटींपर्यंत पोहोचली होती. तर एलआयसीने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२२ पर्यंत एकट्या अदाणी समूहात एलआयसीने ३५,९१७.३१ कोटी रुपये गुंतवले आहेत. यामध्ये इक्विटी आणि कर्ज दोन्ही आहे.

हिडेंनबर्ग रिसर्च संस्थेने २४ जानेवारी २०२३ रोजी आपला अहवाल सार्वजनिक करत अदाणी समूहाला ८८ प्रश्न विचारले होते. यानंतर अदाणी समूहाला जबरदस्त धक्का पोहोचला. यामुळे अदाणी समूहाचे लाखो कोटींचे नुकसान झाले. अदाणींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. ज्याचा फटका एलआयसीच्या शेअर्सलाही बसला. एलआयसीचे शेअर देखील घसरले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *