मुंबई: महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.
त्यानुसार आज (रविवारी) भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आता रमेश बैंस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. ते झारखंडचे राज्यपाल होते.
सुरुवातीला लोकसभेच्या माजी अध्यक्षा तथा भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांचे नाव महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी चर्चेत होते. पण त्या मुंबईच्या असल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर गुजरातमधील एका नेत्याचे नाव चर्चेत आले. पण ते ही मागे पडले. काँग्रेसचे माजी बंडखोर नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव समोर आले होते.
आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून रमेश बैंस यांच्या नावाची घोषणा राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांनी केली आहे.
कोण आहेत नवीन राज्यपाल रमेश बैंस..जाणून घ्या.
रमेश बैंस यांचा जन्म २ आँगस्ट १९४७ रोजी झाला. १९७८ मध्ये ते पहिल्यांदाच रायपूरनगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
१९८० ते १९८४ दरम्यान मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते.
१९८९ मध्ये रमेश बैस यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवून ते खासदार झाले.
छत्तीसगढ़-मध्यप्रदेशाचे विभाजन झाल्यावर त्यांनी रायपूर लोकसभा निवडणूक लढवून ते खासदार झाले. ते सात वेळा खासदार होते.
राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांची यादी
रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश
लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्किम
राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार
लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश