• Sat. May 3rd, 2025

अदानींवरील संकट अधिक गडद;टॉप २० मधून आउट

Byjantaadmin

Feb 11, 2023
नवी दिल्ली : अदानी समूहाला या आठवड्याच्या सुरवातीचे तीन दिवस दिलासा देणारे होते. पण गुरुवार आणि शुक्रवारी अदानी समूहाला पुन्हा झटके बसू लागले आहेत. इंडेक्स प्रोवायडर एमएससीआयने अदानी समूहाच्या चार कंपन्यांच्या शेअर्सची फ्री फ्लोट स्थिती कमी केली. यामुळे या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव घसरले. शेअर बाजारा होत असलेल्या नुकासानीमुळे अदानींच्या एकूण संपत्तीत ५५ हजार कोटी रुपये म्हणजे १० टक्क्यांची घसरण झाली आहे. आणि ते फक्त दोनच दिवसांत टॉप २० मधून बाहेर झाले आहेत.
घसरणीमुळे गौतम अदानींचे मोठे नुकसान झाले आहे. फोर्ब्स रियल टाइम बिलेनियर्सनुसार अदानींच्या एकूण संपत्तीत १० टक्क्यांहून अधिकची घसरण झाली आहे. म्हणजेच ६.६ बिलियन डॉलर अर्थात ५५ हजार कोटींची घसरण दिसून आली आहे. आता गौतम अदानींची एकूण संपत्ती ५८.४ अब्ज डॉलर इतकी राहिली आहे. एक दिवसापूर्वी अदानींची एकूण संपत्ती ६० अब्ज डॉलरहून अधिक झाली होती. एका दिवसात अदानींना २.४ अब्ज डॉलर इतके प्रचंड नुकसान झाले आहे.

टॉप २० मधून बाहेर

गौतम अदानींच्या एकूण संपत्तीत घसरण झाल्याने ते जगातील टॉप २० अब्जाधिशांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. ते यात दोन दिवसही आपले स्थान टिकवू शकले नाहीत. दोन दिवसांत ते १७ व्या क्रमांकावरून घसरत २२ व्या क्रमांकावर गेले आहेत. यापूर्वी ते २१व्या क्रमांकावरून १७ व्या क्रमांकावर पोहोचले होते. पण अलिकडच्या ताज्या घसरणीच्

एमएससीआयचा अदानी समूहाला झटका

एमएससीआयने अदानी समूहाच्या भारमध्ये कपात केली आहे. त्यात अदानीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेसचाही समावेश आहे. हिंडेनबर्गचा रिसर्च रिपोर्ट २४ जानेवारीला समोर आल्यानंतर हे पाऊल टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. अदानी समूहाने शेअर्समध्ये हेराफेरी केल्याचा आरोप हिंडेनबर्गच्या रिपोर्टमधून करण्यात आला होता. पण अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
या झटक्याने त्यांची ५ क्रमांक घसरण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *