• Fri. May 2nd, 2025

महिला विधिज्ञांच्या आंतराराष्ट्रीय परिषदेत देशाच्या  विविध  प्रांतातील महिला विधिज्ञ सहभागी होणार : ऍड. जयश्रीताई पाटील 

Byjantaadmin

Feb 10, 2023
महिला विधिज्ञांच्या आंतराराष्ट्रीय परिषदेत देशाच्या  विविध
 प्रांतातील महिला विधिज्ञ सहभागी होणार :  अॅड.  जयश्रीताई पाटील
लातूर :  इंटरनॅशनल  फेडरेशन ऑफ वूमन लॉयर्स अर्थात  महिला वकील आंतरराष्ट्रीय महासंघाची  वार्षिक परिषद  यावर्षी दि. १५ व १६ फेब्रुवारी २०२३ रोजी कुवैत येथे संपन्न होणार आहे. या परिषदेत आशिया खंडातील विविध देशांच्या  अनेक महिला विधिज्ञ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आपल्या देशातूनही विविध प्रांतातील महिला विधिज्ञ यामध्ये भाग घेणार आहेत.  तूर जिल्ह्यातून आपण  या परिषदेत सहभागी होण्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ सौ. जयश्रीताई पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
               कुवैत बार असोसिएशनच्या वतीने आशिया खंडातील विविध देशात वकिली व्यवसाय करणाऱ्या महिला विधिज्ञांसाठी सदर  परिषदेचे  आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत घरगुती हिंसाचार कायद्याचे काम,  यामध्ये वेगवगेळ्या  देशांचा अनुभव , घरगुती हिंसाचार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये  स्वयंसेवी संस्थांची  भूमिका, महिलांविषयक निर्णय घेणार्‍या संस्थांमध्ये महिलांचा सहभाग, कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांना येणारे अनुभव आणि त्यांच्या अडचणी आदी विषयावरील परिसंवाद या आंतरराष्ट्रीय परिषदेत होणार असल्याचे सांगून एड. सौ. जयश्रीताई पाटील पुढे म्हणाल्या की, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ वूमन लॉयर्स ही संघटना सन  २००७ साली आंतरराष्ट्रीय  वूमेन्स फेडरेशनशी संलग्न झाली.  तर महाराष्ट्र वूमेन्स लॉयर्स फेडरेशन ची स्थापना २००८ मध्ये झाली. ही संघटनाही त्याच्याशी संलग्न राहून कार्य करते.  जागतिक पातळीवर महिलांच्या संरक्षण, हक्कासाठी लढण्याचे काम ही संघटना करते. महिलांना समाजात सन्मानाने जगण्याचा, वावरण्याचा हक्क आहे. राष्ट्र कोणतेही असले तरी   बहुतांश महिलांना जणू एकसारख्याच समस्यांचा सामना करावा लागतो, अशी एकंदर स्थिती आहे.  या संघटनेच्या माध्यमातून महिलांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच त्यांना संघटित होण्याचेही आवाहन करण्यात येते. महिला विधिज्ञांच्या माध्यमातून महिलांच्या समस्या सोडवण्यावर ही संघटना प्राधान्याने भर देत असल्याचे सौ. पाटील यांनी सांगितले.
भारतातील दोन हजारांहून अधिक महिला विधिज्ञ या संघटनेशी जोडल्या गेल्या आहेत असे सांगून कुवैत येथे होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपण महिलांना समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असेही जयश्रीताई पाटील यांनी यावेळी सांगितले.
ज्येष्ठ विधिज्ञ अण्णाराव पाटील यांनी महिलांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेस जाणाऱ्या जयश्रीताई पाटील यांना शुभेच्छा देऊन ई फायलिंग सुविधेतून तालुका व जिल्हा न्यायालयांना वगळण्यात यावे, असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी महिला विधिज्ञ  अॅड. सुरेखा जानते,  अरुणा वाघमारे, रजनी गिरवलकर, प्रणिता कांबळे, प्रतिभा कुलकर्णी, सुचिता सगर,प्राजक्ता कुलकर्णी, तृष्णा काळे, सुनंदा इंगळे, अंजली जोशी  आदी महिला विधिज्ञांची  उपस्थिती होती.

 

 

 

 

*राज्यस्तरीय धनगर समाज वधुवर परिचय मेळावा लातूरात सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते होणार उद्घाटन*

*https://jantaexpress.co.in/?p=3544*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *